आवृत्ती पुणे
← Back to Homepage

महिलेला चिरडणाऱ्या डंपर चालकाला केली अटक

Spread the love

मार्केटयार्ड पोलीसांची कामगिरी

पुणे : मार्केटयार्ड परिसरात भरधाव डंपरने धडक दिल्याने महिलेचा मृत्यू झाला होता. त्यानंतर पळून गेलेल्या चालकाला व डंपर मालकाला पोलिसांनी अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार हा अपघात १२ जून बुधवारी दुपारी १२:३० च्या सुमारास घडला होता.पोलिसांनी घटना स्थळी धाव घेतली होती. या अपघातात दुचाकी वर बसलेल्या दमयंती भूपेंद्र सोलंकी (वय ५९) या महिलेचा जागीच मृत्यू झाला होता.

पोलिसांनी ट्रक मालक गणेश प्रकाश बांदल (वय ३६, रा. बावधन) यास डंपर चालक अशोक महंतो यास अटक केली आहे. या प्रकरणी प्रियंका सोलंकी (वय ३८, रा.गंगा धाम रोड) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिस निरीक्षक राहुल कुमार खिलारे तपास करीत आहेत.

get_footer();