आवृत्ती पुणे
← Back to Homepage

माँ आशापुरा माता मंदिरातील श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा महोत्सव उत्साहात संपन्न

maharashtra jain warta • Maharashtra Jain Warta, MJW - Social News, MJW Daily News(Post Slider), News Slider, Social • January 24, 2024
Spread the love

पुणे : पुण्यातील बिबवेवाडी येथील गंगाधाम चौकातील माँ आशापुरा माता मंदिरात 22 जानेवारी रोजी पार पडलेल्या अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा महोत्सव आयोजित करण्यात आला.

यामध्ये प्रसिद्ध कलाकार संदीप पंचवाटकर, विवेक पांडे यांनी श्रीराम यांच्यावर आधारित असलेल्या गाण्यांची सुरेल मैफल सादर केली. यावेळी उपस्थित नागरिक मंत्रमुग्ध होऊन या सुरेल संध्याचे साक्षीदार झाले होते. त्याबरोबरच भजन संध्या, भव्य दिपोत्सव, फायर शो असे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. आलेल्या रामभक्तांनी अयोध्यानगरीतील पवित्र मातीचे दर्शन घेतले. या महोत्सवात उपस्थित नागरिकांनी नृत्य, फुगडी खेळत या दिवसाचा मनमुराद आनंद लुटला.. हा कार्यक्रम यशस्वी होण्याकरिता शाम खंडेलवाल, दिलीप मुनोत, राजेंद्र गोयल, मंगेश कटारिया यांचे मोलाचे सहकार्य लाभले. यावेळी माँ आशापुरा माता मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष विजय भंडारी, चेतन भंडारी यांच्यासह आमदार माधुरी मिसाळ, विजयकांत कोठारी, राजेश सांकला, इंदर छाजेड, इंदर जैन, पवन बंसल, संजय डागा आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

get_footer();