आवृत्ती पुणे
← Back to Homepage

माँ आशापुरा माता मंदिरात कृतज्ञता सोहळा

Spread the love

पुणे : नवरात्रोत्सवामध्ये सलग दहा दिवस देवीची सेवा करणाऱ्यांचा गौरव करण्यासाठी मां आशापुरा माता मंदिर ट्रस्ट तर्फे बुधवारी विशेष कृतज्ञता सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात मंदिरातील विविध धार्मिक व सामाजिक सेवेत योगदान देणाऱ्यांचा सन्मान करण्यात आला.

मां आशापुरा माता मंदिरात प्राणप्रतिष्ठा, दैनंदिन अभिषेक, नवचंडी याग तसेच विविध पूजाविधी शास्त्रोक्त पद्धतीने पार पडतात. या धार्मिक विधींसाठी राजस्थानहून आलेले पं. जनार्दन ओझा व त्यांच्या नऊ सहकाऱ्यांनी मुक्कामी राहून अखंड सेवा दिली.

त्याचबरोबर मंदिरातील इतर कामकाजासाठी विविध स्वयंसेवकांनी पूर्णवेळ सेवा बजावली. यामुळे मंदिरात येणाऱ्या भाविकांना श्रद्धा आणि भक्तीभावाने देवीचे दर्शन घेता आले. त्यांच्याच या योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा सोहळा आयोजित करण्यात आला.

या सोहळ्याला चेतन भंडारी, शाम खंडेलवाल, मंगेश कटारिया, गोपाल अग्रवाल, भारती भंडारी, लीना भंडारी, दिलीप मुनोत, रेखा खंडेलवाल, सुरेश दुसाद, राजेश सोनी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

← Back to Homepage

माँ आशापुरा माता मंदिरात ढोल-ताश्याच्या गजरात घटस्थापना होऊन नवरात्र उत्सवाला प्रारंभ

Spread the love

पुणे : माँ आशापुरा माता मंदिरातील नवरात्र उत्सवाला आजपासून सुरुवात झाली. अत्यंत भक्तिभावात शंभर महिलांच्या विशेष ढोल पथकाच्या गजरात मंदिरात ट्रस्टचे अध्यक्ष विजय भंडारी व भारती भंडारी, चेतन भंडारी व लीना भंडारी, विमलाबाई भंडारी आणि भंडारी परिवारासह प्राप्तिकर विभागाचे वरिष्ठ अधिकारी श्रीकृष्ण मुरारी यांच्या उपस्थितीत घटस्थापना होऊन देवीची आरती करण्यात आली. याप्रसंगी पदाधिकारी व अन्य मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

माँ आशापुरा माता मंदिर ट्रस्टच्या वतीने मंदिरातील नवरात्र उत्सवाची जय्यत तयारी करण्यात आली आहे. या निमित्ताने माँ आशापुरा माता मंदिराची अत्यंत मनमोहक अशी सजावट करण्यात आली आहे.

यंदाचा नवरात्र उत्सव दहा दिवसांचा असणार असून यामध्ये विविध सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक व आरोग्यविषयक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती माँ आशापुरा माता मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष विजय भंडारी व चेतन भंडारी यांनी दिली.

शंभर महिलांचा सहभाग असलेल्या विशेष ढोल पथकाचे ढोल-ताशा वादन हे आजच्या घटस्थापनेचे वैशिष्ट्य ठरले. आजपासून सुरू झालेल्या या नवरात्र उत्सवामध्ये अभिषेक, आरती, नवचंडी महायज्ञ, माता की चौकी, भजन, श्रीसुक्त पठण, कन्यापूजन, नवदुर्गा सन्मान पुरस्कार सोहळा, श्री देवीसुक्त मंत्र सामूहिक पठण, देवी सहस्रार्चन आदी धार्मिक, सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत.

नवरात्र उत्सवामध्ये दररोज सकाळी ६.३० वाजता आरती होणार असून ७ ते ९ दरम्यान अभिषेक होणार आहे. नवचंडी महायज्ञ दुपारी ३.३० ते सायंकाळी ७ पर्यंत होणार आहे. सायंकाळी ७ वाजता महाआरती होणार असून त्यानंतर देवीचे भजन व माता की चौकी होणार आहे.

नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने मंगळवारी, २३ सप्टेंबर रोजी सायंकाळी ८ वाजता वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून यामधील विजेत्यांना ३२ इंच एलईडी टीव्ही, मायक्रोवेव्ह व ब्लूटुथ स्पीकर पारितोषिक म्हणून देण्यात येणार आहे.

आयु निर्माण हेल्थ फाउंडेशनच्या वतीने शनिवारी, २७ सप्टेंबर रोजी मोफत आयुर्वेदिक आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर सकाळी १० ते दुपारी ४ पर्यंत असणार आहे. याबरोबरच बुधवारी, १ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ७ वाजता युवकांचा सहभाग असलेला नवरात्र स्पेशल फ्लॅश मॉब होणार आहे.

← Back to Homepage

माँ आशापुरा माता मंदिरात सोमवारपासून शारदीय नवरात्र उत्सवाला प्रारंभ

maharashtra jain warta • Maharashtra Jain Warta, MJW - Social News, MJW Daily News(Post Slider), News, News Slider, Social • September 20, 2025
Spread the love

पुणे : अश्विन शुक्ल प्रतिपदेपासून म्हणजे सोमवारी घटस्थापनेपासून यावर्षीच्या शारदीय नवरात्र उत्सवाला सुरुवात होणार आहे. या नवरात्र उत्सवानिमित्त माँ आशापुरा माता मंदिरात तयारीला वेग आला आहे. यंदाचा उत्सव दहा दिवसांचा असणार असून यामध्ये विविध सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक व आरोग्यविषयक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती माँ आशापुरा माता मंदिर ट्रस्टचे प्रमुख विजय भंडारी व चेतन भंडारी यांनी दिली.

यावर्षीच्या नवरात्र उत्सवाची सुरुवात सोमवारी सकाळी १०.३० वाजता घटस्थापनेने होईल. शंभर महिलांचा सहभाग असलेल्या विशेष ढोल पथकाच्या गजरात घटस्थापना होऊन नवरात्र उत्सवाला प्रारंभ होणार आहे.

या नवरात्र उत्सवामध्ये अभिषेक, आरती, नवचंडी महायज्ञ, माता की चौकी, भजन, श्रीसूक्त पठण, कन्यापूजन, नवदुर्गा सन्मान पुरस्कार सोहळा, श्रीदेवी सूक्त मंत्र सामूहिक पठण, देवी सहस्रार्चन आदी धार्मिक, सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत.

नवरात्र उत्सवामध्ये दररोज सकाळी ६.३० वाजता आरती होईल, तर सकाळी ७ ते ९ या वेळेत अभिषेक होणार आहे. नवचंडी महायज्ञ दुपारी ३.३० ते सायंकाळी ७ पर्यंत पार पडेल. सायंकाळी ७ वाजता महाआरती होईल, त्यानंतर देवीचे भजन आणि देवीच्या गाण्यांचा कार्यक्रम ‘माता की चौकी’ होईल.

यावर्षी ‘आयु निर्माण हेल्थ फाउंडेशन’च्या वतीने शनिवारी २७ सप्टेंबर रोजी मोफत आयुर्वेदिक आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर सकाळी १० ते दुपारी ४ पर्यंत चालणार आहे. याबरोबरच बुधवारी १ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ७ वाजता युवकांचा सहभाग असलेला नवरात्री स्पेशल फ्लॅश मॉब होणार आहे.

माँ आशापुरा ही राजस्थानमधील अनेकांची कुलदेवता आहे. महाराष्ट्रात आशापुरा मातेचे मंदिर नसल्याने पुणे आणि परिसराबरोबरच महाराष्ट्रात स्थायिक झालेल्या परंतु मूळच्या राजस्थानमधील लोकांना लग्नकार्य अथवा इतर धार्मिक कार्यक्रमासाठी राजस्थानमध्ये जावे लागत असे.

नागरिकांना इथेच आशापुरा मातेचे दर्शन घेता यावे, या हेतूने विजय भंडारी आणि त्यांच्या परिवाराने गंगाधाम चौकाजवळ माँ आशापुरा मातेचे भव्य मंदिर बांधले. याठिकाणी होत असलेला नवरात्र उत्सवदेखील खूप वेगळ्या स्वरूपाचा आणि समाजाला दिशा देणारा आहे. त्यामुळे भाविक मोठ्या प्रमाणात याठिकाणी दर्शनासाठी येतात.

माँ आशापुरा नवरात्र उत्सवातील महत्वाचे कार्यक्रम
सोमवार, २२ सप्टेंबर – शंभर महिलांच्या विशेष ढोल पथकाच्या गजरात घटस्थापना – सकाळी १०.३०
शुक्रवार, २६ सप्टेंबर – श्रीसूक्त पठण – सकाळी ७
शुक्रवार, २६ सप्टेंबर – महिला सशक्तीकरण चर्चासत्र – सायं. ७.३०
शनिवार, २७ सप्टेंबर – श्रीदेवी सूक्त पठण – दुपारी २
शनिवार, २७ सप्टेंबर – मोफत आयुर्वेदिक आरोग्य तपासणी – सकाळी १० ते दुपारी ४
सोमवार, २९ सप्टेंबर – नवदुर्गा सन्मान पुरस्कार समारंभ – सायं. ७.३०
बुधवार, १ ऑक्टोबर – नवरात्री स्पेशल फ्लॅश मॉब – सायं. ७.३०

देवीच्या रुपातील माता-भगिनींचा सन्मान!
आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये देवीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आणि या देवींचा जागर व्हावा, त्यांची पूजा व्हावी म्हणून घटस्थापनेपासून ते दसऱ्यापर्यंत नवरात्र उत्सव साजरा केला जातो. या उत्सवात देवीची मनोभावे पूजा केली जाते. भारतीय संस्कृतीमध्ये महिलांना देवीचे रूप मानले जाते. त्यामुळे नवरात्र उत्सवात महिलांचा सन्मान करण्याची परंपरा माँ आशापुरा माता मंदिरात आहे. माता-भगिनींचा सन्मान करण्यामुळे साक्षात देवीमातेचाच सन्मान झाल्यासारखे वाटते. या कारणास्तव माता-भगिनींच्या प्रती आदर व्यक्त करण्यासाठी माँ आशापुरा माता मंदिरात होणाऱ्या नवरात्र उत्सवात सेवा सप्ताहाचे आयोजन करण्यात येते. अनेक सामाजिक उपक्रम राबविले जातात आणि विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या कर्तृत्ववान महिलांना नवदुर्गा सन्मान पुरस्कार देऊन गौरव केला जातो. महिलांचे सबलीकरण व्हावे म्हणून काय करता येईल, या अनुषंगाने महिलांसंबंधीच्या विविध विषयांवर चर्चासत्राचे आयोजन देखील केले जाते. यावर्षी होणाऱ्या नवरात्र उत्सवात देखील हे सर्व उपक्रम व कार्यक्रम आयोजित करण्यात आले असून आशापुरा मातेचा आशीर्वाद घेण्यासाठी आपण अवश्य यावे. – विजय भंडारी (अध्यक्ष, माँ आशापुरा माता मंदिर ट्रस्ट)

← Back to Homepage

माँ आशापुरा माता मंदिरात होणार श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा महोत्सव

maharashtra jain warta • Maharashtra News Networks, MNN - Daily News(Post Slider), MNN - Social News, Other, People, Social • January 20, 2024
Spread the love

पुणे : येत्या 22 जानेवारी रोजी अयोध्येत श्रीराम मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर पुण्यातील बिबवेवाडी येथील गंगाधाम चौकातील माँ आशापुरा माता मंदिरात सायंकाळी ७ वाजता श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

यावेळी प्रसिद्ध कलाकार संदीप पंचवाटकर हे श्रीराम यांच्यावर आधारित असलेल्या गाण्यांची सुरेल मैफल सादर करणार आहेत. त्याबरोबरच भजन संध्या, भव्य दिपोत्सव, फायर शो असे विविध कार्यक्रम आयोजित केले आहेत.
या महोत्सवात जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन माँ आशापुरा माता मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष विजय भंडारी यांनी केले आहे.

get_footer();