आवृत्ती पुणे
← Back to Homepage

मागास वर्ग आयोगातर्फे मराठा समाजाचे सर्वेक्षण सूरु

Spread the love

भूम : महाराष्ट्र राज्य मागास वर्ग आयोगातर्फे मराठा समाजाचे सामाजिक शैक्षणिक, आर्थिक मागासलेपण तपासण्यासाठी सर्वेक्षण करण्यात येणार आहे.

शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमार्फत २३ जानेवारी ते ३१ जानेवारी या कालावधीत हे सर्वेक्षण करण्यात येईल. या कालावधी दरम्यान नियुक्त केलेले अधिकारी आणि कर्मचारी घरोघरी जाऊन कुटूंबाची माहिती घेणार आहेत.
नियुक्त अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना आयोगा मार्फत सर्वेक्षणासाठी ओळखपत्र उपलब्ध करुन देण्यात आली आहेत. तसेच सर्वेक्षणासाठी खास अत्याधुनिक सॉफ्टवेअर तयार करण्यात आले आहे. सर्वेक्षणा दरम्यान केवळ मराठा समाज व खुल्या प्रवर्गातीत कुटूंबाची माहिती प्रश्नावलीव्दारे भरुन घेतली जाईल. कुटुंब आरक्षित प्रवर्गातील असल्याची माहिती प्रगणकाला मिळाल्यानंतर त्या कुटुंबाची पुढील माहिती घेतली जाणार नाही.
सर्वेक्षणाचा कालावधी कमी असल्याने प्रगणक सकाळी लवकर अथवा सायंकाळी उशीरा सर्वेक्षणासाठी येऊ शकतात. तरी नागरिकांनी त्यांना आवश्यक माहिती देऊन सर्वेक्षणास सहकार्य करावे, असे आवाहन तहसीलदार सचिन खाडे यांनी केले आहे.

get_footer();