आवृत्ती पुणे
← Back to Homepage

“मार्केटयार्डात येणारे वारकरी हे पांडुरंगाचे रूप” : अभय संचेती

Spread the love

पुणे : “माऊली माऊली”च्या गजरात, “पांडुरंग”च्या जयघोषात, मार्केटयार्डात दाखल झालेल्या वारकऱ्यांचे भव्य स्वागत करण्यात आले. वारकऱ्यांना पांडुरंगाचे रूप मानत, यंदाही स्व. इंदुमती बन्सीलाल संचेती ट्रस्टतर्फे सुमारे ३०० हून अधिक वारकऱ्यांना मेडिकल किट्सचे वाटप करण्यात आले.

यावेळी अभय संचेती म्हणाले, “वारकरी बंधूंचे पुणे नगरीतील आगमन हे पुणेकरांचे भाग्य आहे. महाराष्ट्रात सुजलाम-सुफलाम परिस्थिती निर्माण व्हावी, पावसाचे समाधानकारक प्रमाण असावे, प्रत्येकाच्या जीवनात सुख आणि शांतता नांदावी, यासाठी हे वारकरी शेकडो किलोमीटरचा प्रवास करतात.

आमच्यासाठी मार्केटयार्डात येणारे हेच वारकरी म्हणजे पांडुरंगाचेच साक्षात रूप आहेत.” कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून कॉग्रेसचे जेष्ठ नेते अभय छाजेड,भाजपाचे श्रीनाथ भिमाले, मानसी देशपांडे, राजश्री शिळीमकर मनोज देशपांडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनीषा पाटील, विजय शिंगवी, मनीष संचेती, रिद्धी संचेती, किरण छाजेड तसेच दिंडी प्रमुख विश्वनाथ शेटे यांची उपस्थिती होती.

दिवाळीपेक्षाही अधिक चैतन्यमय वातावरण या दोन दिवसांत मार्केटयार्डात अनुभवायला मिळते.या कार्यक्रमाला राजू काग, सुरेंद्र श्रीश्रीमाळ, सचिन गदिया, हरकचंद देसर्डा, प्रवीण नहार, सुरेश वानगोता, संकेत बोथरा, महेश गायकवाड, विशाल चांदणे, सूर्यकांत झेंडे, चंपालाल मुथा यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

get_footer();