आवृत्ती पुणे
← Back to Homepage

मार्केट यार्डमध्ये दिंडी मुक्कामी करणाऱ्यांचा मर्चंट चेंबरतर्फे सत्कार

पुणे : मार्केट यार्डमध्ये दरवर्षीप्रमाणे यंदाही ४० दिंड्या मुक्कामी थांबतात. या सर्व दिंड्यांची व्यवस्था ज्या व्यक्तींकडे असते, अशा यजमानांचा सत्कार नुकताच मार्केट यार्ड मर्चंट चेंबर कमिटीच्या वतीने करण्यात आला.

या सत्कार समारंभात कमिटीचे रायकुमार नहार, अजित बोरा, ईश्वर नहार, आशिष दुगड, राजेंद्र बाठिया, मुकेश छाजेड, दिनेश मेहता, संदीप शहा, महिपाल राजपुरोहित यांच्यासह इतर पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या उपक्रमाच्या माध्यमातून वारकऱ्यांची सेवा करणाऱ्या यजमानांचा सन्मान करत पारंपरिक मूल्यांची जपणूक करण्यात आली.

get_footer();