आवृत्ती पुणे
← Back to Homepage

मित्राला शिवीगाळ करून ठार मारण्याची धमकी

Spread the love

पुणे : मित्राला शिवीगाळ करून ठार मारण्याची धमकी देण्याचा प्रकार ताडीवाला रोड परिसरात घडला आहे. या प्रकरणी तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हे सर्व जन एकमेकांचे मित्र आहेत. १८ ऑगस्ट रोजी सायंकाळी 7 च्या सुमारास ही घटना घडली. फिर्यादी हे मित्रासह मोटार सायकलने घरी येत असताना मारूती मंदिर चौक, ताडीवाला रोड येथे तीन मित्रांनी किरकोळ वादातून फिर्यादी यांची मोटार सायकल अडवली व त्यांना शिवीगाळ करून ठार मारण्याची धमकी दिली. त्याच्या डोक्यात लोखंडी वस्तूने मारले.

get_footer();