आवृत्ती पुणे
← Back to Homepage

मी मालक बोलतोय असे भासवून, ४० लाख रुपये केले ट्रान्सफर

Spread the love

पुणे : कंपनीचा मालक बोलत असल्याचे भासवत संबंधित कंपनीमध्ये काम करणाऱ्याला ऑनलाइन पैसे पाठवण्यास भाग पाडून फसवणुकीचा नवा प्रकार समोर आला आहे. कंपनीच्या खात्यातून तब्बल ४० लाख ६० हजार रुपये ट्रान्सफर करण्यात आल्याचे समोर आले आहे.

या प्रकरणी आशिष राजीव बोडस (वय ३९, रा. प्रभात रस्ता) यांनी डेक्कन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अनोळखी आरोपींनी एका कंपनीच्या कार्यालयात काम करणाऱ्या आशिष बोडस यांना व्हॉट्सअॅप कॉल केला. मी महत्त्वाच्या मीटिंगमध्ये आहे.

कृपया व्हॉट्सअॅप मेसेज तपासा आणि सांगितल्या प्रमाणे करा, असे सांगून फोन बंद केला. बोडस यांनी व्हॉट्सअॅप पाहिले असता खालील बँक खात्यावर सांगितल्या प्रमाणे ४०,६०,९०९ रुपये ट्रान्सफर करा, असे म्हटले होते.

मालकांना पैसे हवे असल्याचे समजून त्यांनी सांगितल्या प्रमाणे पैसे ट्रान्स्फर केले. कन्फर्म करण्यासाठी फिर्यादींनी त्या क्रमांकावर पुन्हा फोन केला असता सायबर चोरट्यांनी फोन कट करून, मीटिंगमध्ये असल्या – कारणाने फोनवर बोलणे शक्य नाही. असे उलट मेसेज त्यांना केला. मात्र मालकांनी असा काही मेसेज केलाच नसल्याचे उघड झाले. या प्रकरणाचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्वप्नाली शिंदे या करीत आहेत.

get_footer();