आवृत्ती पुणे
← Back to Homepage

‘मुक्तांगण’ लायन्स झोन सोशलचा रंगला सोहळा

Spread the love

बार्शी : बार्शी लायन्स टाऊन संस्थेचे चेअरमन ला. प्रकाश फुरडे यांचा वतीने बार्शी पानगांव या ठिकाणी ‘मुक्तांगण’ या नावाने घेतलेली लायन्स झोन सोशलचा कार्यक्रम दि. २५ फेब्रुवारी रोजी संपन्न झाला.

या कार्यक्रमाला रिझन चेअरमन राजेंद्र कासवा यांच्यासह डॉ. गुलाबचंदजी शहा, डॉ. व्यंकटेश यजुर्वेदी, सुनील सुतार या माजी प्रांतपालाची यावेळी उपस्थिती होती.

शिवारामधील अत्यंत रमणीय वातावरणामध्ये रुचकर भोजन, गुळभेंडी हुरड्याचे नियोजन करण्यात आले होते. बार्शी टाउनचे काम पाहून मान्यवरांनी तोंड भरून कौतुक केले.

या झोन सोशल मध्ये बेस्ट ऍडमिनिस्ट्रेशन लायन्स क्लब बार्शी टाऊन, बेस्ट ऍक्टिव्हिटी ई वेस्ट कलेक्शन लिओ क्लब बार्शी टाऊन, बेस्ट प्रेसिडेंट तेजस्वीनी क्लब अर्चना आवटे, बेस्ट सेक्रेटरी हिम्मत भानुशाली, बेस्ट ऍक्टिव्ह सदस्य हेमंत जमदाडे, कविता अंधारे, लिओ उदयन सावंत तर बेस्ट झेड सी विजिट लायन्स क्लब मेट्रो सोलापूर यांना पारितोषिक देवून सन्मान करण्यात आले.

झोन मध्ये १५० सदस्यांची उपस्थिती होती. झोनचेअरमन प्रकाश फुरडे, शर्वरी फुरडे तसेच झोन सचिव अजित देशमुख यांनी सर्वांचे मनापासून आभार मानले.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी लायन्स क्लब बार्शी टाउन अध्यक्ष योगेश कुलकर्णी , सचिव हिम्मत भानुशाली, अतुल सोनिग्रा, रवी प्रकाश बजाज, शंभूलाल भानुशाली तसेच बार्शी टाउन मधील तिनी क्लबचे पदाधिकारी यांचे विशेष सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संताजी सावंत व विनोद यांनी केले.

get_footer();