आवृत्ती पुणे
← Back to Homepage

मुनोत विद्यालयात सनई- चौघड्यांच्या निनादात स्वागत

Spread the love

पुणे : कात्रज कोंढवा रोड येथील मुनोत प्राथमिक व माध्यमिक विद्यालायमध्ये नवीन शैक्षणिक वर्षानिमित्त विद्यार्थ्यांचे स्वागत महाराष्ट्राचे आराध्य दैवत खंडेरायांचे संबळ वाद्य व सनई चौघड्याच्या निनादात करण्यात आले. विद्येची देवता गणपती, सरस्वती, महालक्ष्मी यांची महाआरती करून विध्यार्थाना प्रसाद वाटप करण्यात आले.

याप्रसंगी विद्यार्थी व पालकांचा मराठी शाळेबद्दलचा पारंपारिक कौल व संस्कृती जपण्याच्या हेतूने विद्यार्थांच्या आनंदोस्तवासाठी दरवर्षी बालजत्रेचे आयोजन करत असल्याचे सांगत विद्यार्थांचा उत्साह पाहून आनंद वाटल्याचे मत व्यक्त करीत अशोक मुनोत यांनी पुष्पवृष्टी करून विद्यार्थ्यांचे स्वागत केले.

शाळेच्या पहिल्या दिवशी पासूनच शाळेची ओढ लागावी यासाठी सर्व विद्यार्थांसाठी बालजत्रा तसे उंटाची सफर आकर्षण ठरली. चैतन्यमय सनई-चौघड्याच्या निनादात शालेय मंदिरातील गणपती, सरस्वती, महालक्ष्मी यांचा अभिषेक व महाआरती करून विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ व आनंदोत्सवाचे आयोजन करण्यात आले.

यावेळी खाऊवाटप करून शाळेमध्ये पालकांनी आनंदोस्तव साजरा केला. याप्रसंगी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अशोक मुनोत, नरेंद्र मरळ, सचिव निखिल मुनोत, भगवान शिंदे तसेच मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

get_footer();