आवृत्ती पुणे
← Back to Homepage

मोक्का गुन्हयातील तडीपार राक्या थोरातला केले जेरबंद

maharashtra jain warta • Maharashtra News Networks, MNN - Daily News(Post Slider), MNN - Social News, Other, Police, Social • February 15, 2024
Spread the love

युनिट ६ गुन्हे शाखेची कारवाई

पुणे : मोक्का गुन्हयातील तडीपार आरोपी राक्या ऊर्फ राकेश थोरात याला जेरबंद करण्यात युनिट ६ गुन्हे शाखेला यश आले आहे.

राक्या ऊर्फ राकेश थोरात (वय २३ वर्षे रा. जुना हापसा, मांजराई नगर, मांजरी बु. ता. हवेली जि. पुणे) याला ताब्यात घेण्यात आले आहे.
पोलीस आयुक्त अमितेश कुमार, यांना मोक्का तसेच इतर गंभीर गुन्हयातील पाहिजे आरोपी शोध मोहिम राबविण्याबाबत सुचना देण्यात आल्या होत्या. त्या अनुषंगाने गुन्हे शाखा युनिट-६ कडील पथक युनिट हद्दीत पेट्रोलिंग करित होते. तेंव्हा युनिटकडील पोलिस अमंलदार मुंढे यांना माहिती मिळाली की, हडपसर पोलीस स्टेशन कडील मोक्का गुन्हयातील पाहिजे आरोपी तसेच तडीपार राक्या ऊर्फ राकेश थोरात हा भापकर मळा, मांजरी या ठिकाणी थांबलेला आहे. ही माहिती वरिष्ठांना कळवुन, माहितीच्या ठिकाणी भापकर मळा, मांजरी यथे जावुन सापळा रचला असता, तो पोलीस पथकाला पाहून पळून जाऊ लागला. त्याचा पाठलाग करुन त्यास शिताफीने ताब्यात घेण्यात आले. त्याला त्याचे नाव पत्ता विचारताच तो उडवाउडवीचे उत्तर देऊ लागला. युनिटकडील पोलीस पथकाने त्याच्याकडे अधिक चौकशी केली. त्याला हडपसर पोलीस स्टेशन येथे दाखल असलेल्या गुन्हयाबाबत विचारपुस केली.तेंव्हा त्याने सांगितले की, तडीपार असताना गणपती विसर्जन मिरवणुकीत डीजे चा आवाज कमी करण्याच्या कारणावरुन रेकॉर्ड वरील गुन्हेगार स्वप्नील ऊर्फ बिट्या कुचेकर व आम्ही इतर साथीदारांनी मिळून एकास जबर मारहाण केली होती. या घटनेबाबत हडपसर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल आहे. या गुन्हयात राक्या ऊर्फ राकेश थोरात हा मोक्का गुन्हयात पाहिजे आरोपी असल्यामुळे त्याला हडपसर पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.
ही कामगिरी पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सहायक पोलीस आयुक्त प्रविण पवार, अप्पर पोलीस आयुक्त, शैलेश बलकवडे, पोलीस उपआयुक्त, गुन्हे शाखा अमोल झेंडे, सहायक पोलीस आयुक्त, गुन्हे सतिश गोवेकर, यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा, युनिट ६ चे पोलीस निरीक्षक उल्हास कदम, पोलीस अंमलदार विठ्ठल खेडकर, बाळासाहेब सकटे, रमेश मेमाणे, नितीन मुंढे, प्रतिक लाहीगुडे, कानिफनाथ कारखेले, ऋषीकेश ताकवणे, सचिन पवार, ऋषीकेश व्यवहारे, नितीन धाडगे, महेंद्र कडु, ज्योती काळे व सुहास तांबेकर यांनी केली.

get_footer();