आवृत्ती पुणे
← Back to Homepage

मोक्यातील आरोपी राजेश कांबळेला केले जेरबंद

maharashtra jain warta • Maharashtra News Networks, MNN - Daily News(Post Slider), MNN - Social News, Other, Police • January 22, 2024
Spread the love

हडपसर पोलिसांची कारवाई, कोर्टामध्ये पेशीकरिता आणल्यानंतर काढला होता पळ

पुणे:- शिवाजीनगर कोर्टामध्ये पेशीकरीता आणल्यानंतर पळालेला मोक्यासारख्या गंभीर गुन्ह्यातील आरोपी राजेश कांबळे याला हडपसर पोलीस स्टेशन, तपास पथकाने जेरबंद केले आहे.

आरोपी राजेश कांबळे हा सन २०१४ पासून येरवडा कारागृहात होता. तसेच आरोपी विरूध्द स्वारगेट पोलीस स्टेशन येथे दाखल गुन्ह्याची नियमीत सुनावणी सुरू होती.
आरोपी याला जिल्हा सत्र न्यायालय, शिवाजीनगर येथे स्वारगेट पोलीस स्टेशन येथे नियमीत पेशी करिता येरवडा कारागृह येथून पोलीस बंदोबस्तात घेऊन गेले होते. राजेश कांबळे याची न्यायालयीन सुनावणी संपल्यानंतर त्यास येरवडा कारागृहाकडे घेऊन जात असताना तो पोलीस पथकाच्या कायदेशीर रखवालीतुन पळून गेला होता. त्याबाबत शिवाजीनगर पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद करण्यात आला होता.
पळून गेलेल्या आरोपीचा शोध घेण्यासाठी वेगवेगळी पथके तयार करण्यात आली होती. परंतु तो मिळून आलेला नव्हता. पोलीस आयुक्त, अप्पर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ५ यांच्या आदेशावरून हडपसर पोलीस स्टेशन तपास पथक आरोपीचा शोध घेत होते. तांत्रिक तपास व बातमीदारांकडून आरोपी केज जिल्हा बिड येथे लपून बसले असल्याची माहिती हडपसर पोलीस स्टेशनच्या पोलीस अंमलदार संदीप राठोड व अजित मदने यांना मिळाली. हडपसर पोलीस स्टेशन तपास पथकाने सापळा रचून पहाटेच्या सुमारास आरोपीला केज, जिल्हा बीड येथून शिताफीने ताब्यात घेतले आहे. ताब्यात घेतलेला आरोपी याला पुढील कायदेशीर कार्यवाही साठी शिवाजीनगर पोलीस स्टेशन यांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
ही कामगिरी पोलीस आयुक्त रितेश कुमार, अप्पर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग रंजनकुमार शर्मा, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ५ आर. राजा, सहाय्यक पोलीस आयुक्त, हडपसर विभाग अश्विनी राख, यांच्या मागदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक हडपसर पोलीस स्टेशन रविंद्र शेळके, पोलीस निरीक्षक (गुन्हे) विश्वास डगळे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) संदीप शिवले, यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक अर्जुन कदळे, पोलीस उप निरीक्षक अविनाश शिंदे, पोलीस अंमलदार, सुशील लोणकर, जोतीबा पवार, सचिन जाधव, प्रशांत टोणपे, प्रशांत दुधाळ, निखील पवार, अतुल पंघरकर, भगवान हंबर्डे, सचिन गोरखे, चंद्रकांत रेजीतवाड, अमोल दणके, कुंडलीक केसकर, रामदास जाधव, यांच्या पथकाने केली आहे.

get_footer();