आवृत्ती पुणे
← Back to Homepage

यापुढे राजकारण नाही तर फक्त समाजकारण करणार

Spread the love

डॉ. राहुल घुले यांनी स्पष्ट केली भूमिका

भुम : कोणत्याही राजकीय पक्षात न जाता मी फक्त समाज कार्य करण्याचा निर्णय घेत आहे. अशी माहिती भूमिपुत्र डॉ.राहुल भिमराव घुले यांनी आज जाहीर केली.

याविषयीं ते म्हणाले, “महाराष्ट्र सध्या राजकीय अस्थिरतेमधून जात असून त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांची विश्वासार्हता धोक्यात आली आहे.
विशेषतः भूम परांडा वाशी तालुक्यातील सर्वसामान्य जनतेच्या मूलभूत प्रश्नांकडे कोणत्याही राजकीय पक्षाचे किंवा नेत्यांचे लक्ष नाही.

अशा परिस्थितीत मी कोणत्याही राजकीय पक्षात न जाता फक्त गोरगरीब,सर्वसामान्य जनतेला सामोरे जावे लागत असलेल्या आरोग्य, रोजगार, शेतकरी बांधवांच्या अडचणी सोडविण्यासाठी आणि त्यांना इतर मूलभूत सुविधा जास्तीत जास्त प्रमाणात कशा मिळतील यावर प्रयत्न करणार असून यापुढे मी फक्त समाज कार्य करण्याचा निर्णय घेत आहे.

get_footer();