आवृत्ती पुणे
← Back to Homepage

युवकांसाठी हाफ पिच क्रिकेट स्पर्धांचे आयोजन

maharashtra jain warta • Maharashtra News Networks, MNN - Daily News(Post Slider), MNN - Social News, Other, People, Sports • February 5, 2024
Spread the love

डॉ. अमोल घुले यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजन

भूम: भूमिपुत्र डॉ. राहुल घुले यांचे बंधु डॉ. अमोल घुले यांच्या वाढदिवसानिमित्त मित्र परिवाराच्या वतीने हाफ पिच क्रिकेट स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. भीमराव घुले यांच्या हस्ते हे उदघाटन ४ फेब्रुवारी रोजी करण्यात आले. मौजे श्री क्षेत्रसोनारी.ता.परांडा येथे या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी भीमराव घुले यांनी श्री काळभैरवनाथांचे मनोभावे दर्शन घेतले. यावेळी मंदिर समितीच्या वतीने भीमराव घुले यांचा सन्मान करण्यात आला. उदघाटन प्रसंगी परांडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ईज्जपवार, पोलीस उपनिरीक्षक कांबळे, पोलीस हेड कॉन्स्टेबल भुजंग, शिंदे, मेजर हाके ऍड.नागरगोजे, उद्योजक गुरुदास कांबळे यांच्यासह अन्य मान्यवर क्रिकेट प्रेमी उपस्थित होते.

get_footer();