आवृत्ती पुणे
← Back to Homepage

युवाशक्ती करिअर मार्गदर्शन शिबिर उत्साहात

Spread the love

650 विद्यार्थ्यांनी घेतला सहभाग

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क

भुम : येथे छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर मार्गदर्शन शिबिर उत्साहात पार पडले.

करिअर मार्गदर्शन शिबिरात 650 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. तसेच या मेळाव्यामध्ये स्वयंरोजगाराची व कौशल्य विकासाची माहिती देण्यासाठी शासनाच्या तसेच विविध आर्थिक विकास महामंडळाच्या योजनांची माहिती देण्यासाठी 7 स्टॉल लावण्यात आले होते. 450 उमेदवारांनी त्याचा लाभ घेतला.

महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत मंगल प्रभात लोढा यांच्या संकल्पनेतून साकार होत असलेल्या शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था भुम, परंडा, वाशी यांच्या संयुक्त विद्यमाने 26 जून रोजी यश मंगल कार्यालय भूम येथे छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर मार्गदर्शन शिबिर उत्साहात पार पडले.

शिबिराचे उद्घाटन उपविभागीय अधिकारी वैशाली पाटील, पीआय प्रल्हाद सूर्यवंशी, बाळासाहेब पाटील हांडोग्रिकर (आयएमसी सदस्य बाळासाहेब क्षीरसागर(आयएमसी सदस्य), जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी प्रवीण औताडे, हर्षद राजूरकर प्राचार्य औद्योगिक प्रशिक्षण संस्था भुम, संतोष कदम प्राचार्य औद्योगिक प्रशिक्षण संस्था परंडा,वाशी व इतर सर्व वक्ते व मान्यवर यांच्या उपस्थितीत झाले.

आय टी आय हे कमी कालावधीत रोजगार मिळकवण्याचे उत्तम साधन आहे असे मनोगत वैशाली पाटील यांनी व्यक्त केले. चव्हाण व्ही. टी. यांनी 10 वी व 12 वी नंतर काय? डॉ. विक्रमसिंह माने (प्राचार्य कॉलज ऑफ इंजिनीरिंग धाराशिव)यांनी उच्च व तंत्र शिक्षण, ऋषिकेश काटे यांनी वक्तिमत्व विकास, अक्षय घोडके यांनी जिल्हा उद्योग केंद्याच्या विविध योजना, कृष्णा तांदळे यांनी बायोडाटा व मुलाखत तयारी, सोमनाथ गुंजाळ यांनी व्यवसाय व करिअर या विषयावर सखोल मार्गदर्शन केले.

या करिअर मार्गदर्शन शिबिरात 650 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. तसेच या मेळाव्यामध्ये स्वयंरोजगाराची व कौशल्य विकासाची माहिती देण्यासाठी शासनाचे विविध आर्थिक विकास महामंडळाच्या योजनांची माहिती देण्यासाठी 7 स्टॉल लावण्यात आले होते. यात 450 उमेदवारांनी स्वयंरोजगाराच्या स्टॉलचा लाभ घेतला.

प्रास्ताविक हर्षद राजूरकर यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी दिनेश मुळे (प्र. गटनिदेशक), प्रणय भोंडेकर, अनिकेत खिलारे, सुदीप महाजन, सुधीर जोशी, रविंद्र वीर, मीना चौरे, हर्षद कळबड, अगाव संजित, रामेश्वर जाधवर, अवधूत गवळी, दादा गवळी, राजाभाऊ देवकते, बळीराम ढाकणे भूम आय टी आय चे व आय टी आय धाराशिव येथील दीपक गुडे, बालाजी वाघमारे यांचे विशेष सहकार्य लाभले. सूत्रसंचालन मनोज चौधरी यांनी केले. आभार प्राचार्य संतोष कदम यांनी मानले.

get_footer();