आवृत्ती पुणे
← Back to Homepage

रमजान ईद निमित्त बोरामणी येथे सामाजिक सलोख्याचा संदेश

Spread the love

मुस्लिम बांधवांना पोलीस अधिकाऱ्यांनी दिल्या शुभेच्छा

सोलापूर : रमजान ईद निमित्त सोलापूर तालुक्यात बोरामणी येथे सामाजिक सलोख्याचा संदेश देण्यात आला. सोलापूर पोलीस ठाणेच्या कार्यक्षेत्रात विविध गावाच्या ठिकाणी नमाज पठाण करण्यात आले होते.

या वेळी संबंधीत पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे यांनी पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अपर पोलीस अधीक्षक प्रितम यावलकर व उपविभागीय पोलीस अधिकारी संकेत देवळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वत्र चोख बंदोबस्ताचे नियोजन केल्यामुळे नमाज पठाणाचा कार्यक्रम शांततेत पार पाडला आहे.

रमजान ईदच्या अनुषंगाने मौजे बोरामणी मध्ये मौलाना आवेस रज्जाक कादरी यांनी नमाज पठाण केले. या वेळी सुमारे ५०० ते ६०० मुस्लिम बांधव तसेच सैफन बुद्रुक शेख, सैफन चाँद पटेल, मलिक महमंद शेख, गौस सैफन शेख, रफिक चमन मुजावर, बशीर महमंद मुजावर, वजीर महमंद मुजावर व जावेद रफिक तगारे अशा गावातील प्रतिष्ठीत व्यक्ती उपस्थित होत्या.

कोणताही अनुचित प्रकार होऊ नये या करीता सोलापूर तालुका, पोलीस ठाणेचे पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे, बोरामणी दुरक्षेत्राचे अधिकारी स्वप्नील ईज्जपवार, सहायक पोलीस निरीक्षक, पोलीस अंमलदार व बोरामणी गावचे पोलीस पाटील महादेव शंकर पाटील उपस्थित होते.

यावेळी पोलीस अधिकाऱ्यांच्या हस्ते लहान मुले, प्रतिष्ठत व्यक्ती व इतर व्यक्तींना पुष्पगुच्छ देऊन रमजान ईदच्या शुभेच्छा देऊन सामाजिक सलोखा राखण्याचा संदेश देण्यात आला.

get_footer();