आवृत्ती पुणे
← Back to Homepage

राज्यस्तरीय अबॅकस स्पर्धेत १४ विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

Spread the love

बार्शीकरांचा राज्यात पुन्हा एकदा दबदबा

बार्शी : जयश्री अबॅकसच्या विद्यार्थ्यांनी राज्यस्तरीय स्पर्धेत उत्तुंग यश संपादन करत बार्शीचा दबदबा कायम ठेवला आहे.

अबॅकस अकॅडमी क्षेत्राच्या राज्यस्तरीय स्पर्धेत, बार्शी येथील जयश्री अबॅकसच्या एकूण १४ विद्यार्थ्यांनी कौतुकास्पद घवघवीत यश संपादन केले.
सर्व यशस्वी गुणवंत विद्यार्थ्यांना प्रमुख मान्यवरांच्या हस्ते मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले.

या स्पर्धेत सर्वो्कृष्ट विद्यार्थी म्हणून आंचल खुणे, अर्णव शिराळ आणि सौम्या बाफना यांना पारितोषिक मिळाले. प्रथम क्रमांकाचे पारितोषिक प्रभव हेद्दा आणि वीर शहा यांना मिळाले. अमन बलदोटा यांना द्वितीय क्रमांकाने गौरवण्यात आले.

चौथा क्रमांक अर्पिता गुगळे, नमन बलदोटा, रुही कटारिया, श्रेया नागटिळक यांना मिळाला तर पाचवे पारितोषिक जयांश बेदमुथा, लक्ष बजाज आणि प्रांजली मेंडके यांनी पटकावले.

जयश्री आबॅकसच्या संचालिका अनिता कथले यांचा उत्कृष्ट शिक्षक म्हणून मानचिन्ह देऊन गौरवण्यात आला. सर्व यशस्वी विद्यार्थ्यां आणि मार्गदर्शक यांचे बार्शी शहर आणि तालुक्यातून वाटचालीसाठी खूप शुभेच्छा देत अभिनंदन आणि कौतुकाचा वर्षाव होत आहे.

get_footer();