आवृत्ती पुणे
← Back to Homepage

राज्यस्तरीय वार्षिक क्रीडा उत्साहात

maharashtra jain warta • Maharashtra News Networks, MNN - Daily News(Post Slider), MNN - Social News, Other, People, Social, Sports • February 15, 2024
Spread the love

महाराष्ट्र कारागृह विभागामार्फत आयोजन

पुणे : कारागृहातील अधिकारी / कर्मचारी यांच्याकरीता राज्यस्तरीय वार्षिक क्रीडा स्पर्धाचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा दौलतराव जाधव तुरुंग अधिकारी प्रशिक्षण महाविदयालय, येरवडा, येथे करण्यात आली आहे.

या राज्यस्तरीय वार्षिक क्रीडा स्पर्धाचे उदघाटन १२ फेब्रुवारी रोजी अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक अमिताभ गुप्ता यांच्या हस्ते झाले.
यावेळी विशेष पोलीस महानिरीक्षक (मुख्यालय) डॉ. जालिंदर सुपेकर, कारागृह उपमहानिरीक्षक (पश्चिम विभाग) तथा राज्यस्तरीय क्रीडा समितीच्या अध्यक्षा स्वाती साठे तसेच जुगनु गुप्ता यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.

या क्रीडा स्पर्धेच्या उदघाटनप्रसंगी अमिताभ गुप्ता व स्वाती साठे यांनी उपस्थित सर्व खेळाडुंना मार्गदर्शन केले. महाराष्ट्र कारागृह विभागाचे एकुण पाच विभाग असुन विभागीय स्तरावरुन विभागीय क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात येतात.

या विभागीय क्रीडा स्पर्धामध्ये ज्या खेळाडुंनी उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे अथवा जे खेळाडु विजेते आहेत अशा खेळाडूंकरीता दरवर्षी मुख्यालय स्तरावरुन वार्षिक क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात येतात.

सन २०२३-२०२४ च्या उदघाटन सोहळया प्रसंगी मान्यवरांच्या उपस्थितीत पुरुष व महिला खेळाडूंच्या १०० मीटर धावण्याच्या स्पर्धा घेण्यात आल्या. १२ फेब्रुवारी ते १६ फेब्रुवारी या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या क्रीडा स्पर्धेमध्ये पुणे विभाग, मुंबई विभाग, छत्रपती संभाजीनगर विभाग, नाशिक विभाग व नागपूर विभागातील जवळपास २२० खेळाडुंनी सहभाग घेतलेला असुन या स्पर्धामध्ये पुरुष व महिला खेळाडूंसाठी १०० मी धावणे, २०० मीटर धावणे, ८०० मीटर धावणे, रिले, थाळीफेक, भालाफेक, गोळाफेक, लांबउडी, कराटे, कुस्ती, बॅडमिंटन एकेरी, रिंगटेनिस एकेरी हे वैयक्तिक खेळ तसेच कबडडी, व्हॉलीबॉल, रस्साखेच या सांघिक खेळांचा समावेश करण्यात आलेला आहे.

अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक (कारागृह व सुधारसेवा) अमिताभ गुप्ता यांचे संकल्पनेतुन २०२४ या वर्षापासुन क्रिकेट या खेळाचा नव्याने समावेश करण्यात आलेला आहे, त्यामुळे सर्व खेळाडूंमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झालेले आहे. शारीरीक व मानसिक स्वास्थ निरोगी राहण्याकरिता खेळाला मानवी जीवनात अनन्य साधारण महत्व आहे. खेळामुळे संघभावना वाढीस लागुन खेळाडुमध्ये शिस्त आणि कामाचा उत्साह वाढीस लागतो.

त्याचबरोबर शारीरीक व मानसिक ताणतणावाचे व्यवस्थापन होऊन एकाग्रता सुधारण्यास मदत होते. निरोगी खेळाडु हे निरोगी समाज घडवतात आणि निरोगी समाज निरोगी देश घडवतो, याच प्रमुख उददेशाने कारागृहातील अधिकारी / कर्मचारी यांच्यामध्ये असलेल्या क्रीडा कौशल्यांना वाव मिळावा, त्यांच्या मध्ये संघभावना वाढीस लागावी व दैनंदीन कामकाजाच्या ताणतणावातुन विरंगुळा मिळावा याकरीता विभागीय व राज्यस्तरीय वार्षिक क्रीडा स्पर्धाचे आयोजन करण्यात आले आहे.

उदघाटन सोहळयाकरीता कारागृह उपमहानिरीक्षक (मुंबई विभाग) योगेश देसाई, दौलतराव जाधव, तुरुंग अधिकारी प्रशिक्षण महाविदयालयाचे प्राचार्य नितीन वायचळ, येरवडा मध्यवर्ती कारागृहाचे अधीक्षक सुनिल ढमाळ, नागपूर मध्यवर्ती कारागृहाचे अधीक्षक वैभव आगे, येरवडा खुले कारागृहाचे अधीक्षक अनिल खामकर तसेच इतर कारागृहांचे अधीक्षक, अधिकारी, कर्मचारी तसेच खेळाडु उपस्थित होते.

get_footer();