आवृत्ती पुणे
← Back to Homepage

रामचंद्र इकारे यांचा माणगंगा साहित्यप्रेमी गौरव पुरस्काराने सन्मान

maharashtra jain warta • Maharashtra News Networks, MNN - Daily News(Post Slider), MNN - Social News, Other, People, Social • February 17, 2024
Spread the love

‘अक्षरांची रांग’ साठी गौरव

बार्शी : फलटण येथे संपन्न झालेल्या साहित्यप्रेमी सेवाभावी फाउंडेशन, फलटण यांच्यावतीने आयोजित 5 व्या राज्यस्तरीय पर्यावरणस्नेही युवा स्पंदन साहित्य संमेलनात रामचंद्र इकारे यांना ‘अक्षरांची रांग’ या ललित लेख संग्रहासाठी राज्यस्तरीय माणगंगा साहित्यप्रेमी गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

संमेलनाचे अध्यक्ष प्राचार्य रवींद्र येवले (ज्येष्ठ विचारवंत), रवींद्र बेडकीहाळ (सदस्य,महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ, मुंबई) यांच्या हस्ते व सुरेश शिंदे (जत्राकार, ज्येष्ठ साहित्यिक), आनंदा ननवरे (ज्येष्ठ साहित्यिक), प्रा रमेश आढाव (ज्येष्ठ पत्रकार), राहुल निकम (नियत वनक्षेत्र अधिकारी,फलटण),ज्येष्ठ कवी प्रदीप कांबळे, साहित्य संमेलनाचे संयोजक माणदेशी साहित्यिक प्रा.ताराचंद्र आवळे आदींच्या उपस्थितीत रामचंद्र इकारे यांना सन्मानित करण्यात आले.

रामचंद्र इकारे यांच्या माणुसकीचं आभाळ या काव्यसंग्रहास विश्वकर्मा तरुण मंडळ, वडशिवणे ता करमाळा यांचाही राज्यस्तरीय गावगाडा साहित्य पुरस्कार जाहीर झाला असून त्याचेही वितरण दि 24 फेब्रुवारी रोजी मॉडर्न कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, पुणे येथे होणार आहे.

get_footer();