आवृत्ती पुणे
← Back to Homepage

राष्ट्रवादी युवक प्रदेश उपाध्यक्षपदी कृष्णराज बारबोले

maharashtra jain warta • Maharashtra News Networks, MNN - Daily News(Post Slider), MNN - Social News, Other, People, Social • February 13, 2024
Spread the love

पक्षनिष्ठेवर जबाबदारीची मोहोर

बार्शी : बार्शीचे माजी उपनगराध्यक्ष आणि युवा नेते कृष्णराज बारबोले यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडून राज्याची जबाबदारी देण्यात आली आहे. राष्ट्रवादी युवक प्रदेश उपाध्यक्षपदी त्यांची नियुक्ती जाहीर केली आहे.

या महत्वाच्या नियुक्तीमुळे बार्शीच्या खांद्यावर राज्याची धुरा आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडल्यानंतर बार्शीतील राष्ट्रवादीचे नेते विश्वास बारबोले यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र, आपण शरद पवार यांच्यासमवेतच राहणार असल्याचे बारबोले यांनी स्पष्ट केले होते आणि पक्षनिष्ठा महत्वाची मानली होती. निवडणूक आयोगाने काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह अजित पवार गटाला दिले. त्यानंतर, शरद पवार गटाने पुन्हा नव्याने लढाई सुरू करण्याचे निश्चित केले. त्यासाठी, ‘राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार’ या नावाने पक्षबांधणी सुरू केली आहे. या राष्ट्रवादीत बार्शीला राज्यस्तरीय जबाबदारी देण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या मान्यतेने ही निवड करण्यात आली असून युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांच्या सहीचे पत्र देण्यात आले आहे. कृष्णराज यांनी मुंबईतील प्रदेश कार्यालयात प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या हस्ते निवडीचे पत्र स्वीकारले. यावेळी, प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख उपस्थित होते. तसेच बार्शीतील राष्ट्रवादीचे पदाधिकारी किरण देशमुख, महेश चव्हाण, विक्रमसिंह पवार आणि केतन पुनमिया हेही उपस्थित होते.

get_footer();