आवृत्ती पुणे
← Back to Homepage

राष्ट्रसंत आनंदऋषीजी पुण्यप्रदान रथाला पुणेकरांचा प्रतिसाद

maharashtra jain warta • Maharashtra Jain Warta, MJW - Social News, MJW Daily News(Post Slider), News, News Slider, Social • April 22, 2024
Spread the love

पुणे : भगवान महावीर 2661 व्या जन्म कल्याणक महोत्सवानिमित्त महावीर स्वामी जन्मकल्याणक महोत्सव समितीच्या वतीने निघालेल्या भव्य शोभायात्रेमध्ये जय आनंद ग्रुप, पुणे संचलित महावीर फूड बँक, पुणेच्या वतीने निघालेल्या राष्ट्रसंत आनंदऋषीजी पुण्यप्रदान रथाला पुणेकर नागरिकांचा भरभरून प्रतिसाद लाभला.

जय आनंद ग्रुप, पुणेचे अध्यक्ष शांतीलाल नवलाखा व सर्व सहकारी सदस्यांच्या नेतृत्वाखाली हे आयोजन करण्यात आले. या पुण्यप्रदान रथावर गोळा झालेले धान्य अनाथ अपंग (दिव्यांग), महिला, वृद्धाश्रमांना मोफत दिले जाणार आहे. गेली २० वर्षात सात लाख किलो धान्य गरजू संस्थांना मोफत दिलेले आहे.

या रथाची संकल्पना पिंपरी चिंचवड जैन महासंघाचे संस्थापक अध्यक्ष प्रा. अशोककुमार पगारिया यांची असून पुणे शहरात जय आनंद ग्रुप-महावीर फूड बँक, पुणे च्या माध्यमातून या रथावर धान्य गोळा केले जाते.


भगवान महावीर जन्म कल्याणक शोभायात्रेमध्ये सदर रथाचे सारथ्य काँग्रेस नेते मोहन जोशी, माजी महापौर मुरलीधर मोहोळ, आमदार रविंद्र धंगेकर, प्रविण चोरबेले, भरत वैरागे, अभय छाजेड, विजयकांत कोठारी, प्रमिलाबाई नौपतलाल सांकला (सिध्दीविनायक ग्रुप), विकास भटेवरा, विमलबाई बंडूलाल भंडारी, काँग्रेस (आय) परिवहन सेल प्रदेश उपाध्यक्षा मनिषा फाटे, सुर्यकांत फाळके, भारत सुराणा यांनी केले.

या प्रसंगी शांतीलाल देसर्डा, प्रविण तालेडा, संतोष कर्नावट, किशोर छाजेड, अनिल लुंकड, संजय कटारिया, रमण कोठारी, विजय धोका, विजय चोरडिया, अॅड. ईश्वर बोरा उपस्थित होते. या रथावर सुमारे 6900 किलो धान्य गोळा झाले अशी माहिती महावीर फूड बँकेचे अध्यक्ष विजयकुमार मर्लेचा यांनी दिली.

get_footer();