आवृत्ती पुणे
← Back to Homepage

राष्ट्रीय सेवा योजनेचे हिवाळी शिबिर संपन्न

maharashtra jain warta • Maharashtra News Networks, MNN - Daily News(Post Slider), MNN - Social News, Other, People, Social • February 6, 2024
Spread the love

प्राचार्य डॉ. एन. एस. व्यवहारे यांच्या उपस्थित समारोप

भुम : पिंपरी चिंचवड,आकुर्डी (पुणे) येथील डॉ. डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ फार्मसीचे विशेष हिवाळी शिबिर चिखलसे ता. मावळ येथे पार पडले.

सध्या प्रत्येक कॉलेजच्या राष्ट्रीय सेवा योजनाच्या (एनएसएस) विद्यार्थ्यांना वेध लागलेत ते एनएसएस युनिटचा आत्मा असलेल्या ‘कॅम्प’चे. असाच एक कॅम्प नुकताच मावळ तालुक्यातील चिखलसे या गावामध्ये पार पडला. सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी व डॉ. डी. वाय. कॉलेज ऑफ फार्मसी यांच्या संयुक्त विद्यमाने हा कॅम्प आयोजित करण्यात आला होता. दिनांक २९ जानेवारी ते ४ फेब्रुवारी दरम्यान पार पडलेल्या या कॅम्पमध्ये सुमारे ३५ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.बी फार्मसी कॉलेजचे प्राचार्य डॉ. एन. एस. व्यवहारे, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. आशिष चिंबाळकर, प्रा. पवन वानखेडे, प्रा. कल्याणी सहारे, चीखलसे गाव चे सरपंच सचिन काजळे, उपसरपंच दत्तात्रय चांदगुडे ग्रामसेवक प्रशांत घोमसाळे सिद्धांत कॉलेज ऑफ फार्मसी चे प्रा. सागर कोरे यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाची सांगता झाली. या कॅम्पमध्ये कॉलेजने विशेष असे उपक्रम राबवले. त्यात मंगळवार दिनांक ३०, रोजी ग्राम स्वच्छता अभियान व वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन केले, तसेच बुधवार दिनांक ३१ रोजी गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांसाठी अनेक उपक्रमांचे आयोजन केले. त्यात विद्यार्थ्यांना अनेक स्पर्धा परीक्षा बद्दल माहिती देण्यात आली, त्यांना भविष्यातील वाटचालीसाठी मार्गदर्शन करण्यात आले, यांच्या मनोरंजनासाठी वेगवेगळ्या प्रकारचे खेळ घेण्यात आले. तसेच कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. आशिष चिंबाळकर यांनी विशारी-बिनविषारी सापाबद्दल माहिती दिली. दिनांक १ फेब्रुवारी रोजी गावामध्ये मोफत स्वास्थ्य जागरूकता अभियान राबवण्यात आले. या अभियानाला गावकऱ्यांनी भरभरून प्रतिसाद दिला. तसेच दिनांक २ फेब्रुवारी रोजी बेडसे येथील ऐतिहासिक लेण्यांचे संवर्धन व स्वच्छता करण्यात आली. दिनांक ३ फेब्रुवारी रोजी कॅम्प मधील विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळ्या विषयांवर व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले. दिनांक ४ फेब्रुवारी रोजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एन. एस. व्यवहारे यांच्या हस्ते कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. यावेळी बोलताना प्राचार्यांनी विद्यार्थ्यांना राष्ट्रसेवेची भावना सतत आपल्या मनात ठेवण्याचे आवाहन दिले.

get_footer();