आवृत्ती पुणे
← Back to Homepage

रिवॉर्ड पॉइंट रिडीमच्या नादात ज्येष्ठाची फसवणूक

Spread the love

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क

पुणे : सायबर चोरट्यांनी घोरपडी परिसरात राहणाऱ्या ज्येष्ठाची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. बँकेच्या कस्टमर केअरमधून बोलत असल्याचे सांगून ही फसवणुक झाली आहे.

याबाबत अनिल प्रभाकर महाबोले (वय ६५, रा. वाघोली) यांनी मुंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार १३ जून २०२४ रोजी संध्याकाळच्या सुमारास घडला आहे. तक्रारदार यांना अनोळखी मोबाइल क्रमांकावरून फोन आला.

एस बी आय बँकेच्या कस्टमर केअर सेंटरमधून बोलत असल्याचे सांगितले. तुमच्या एस बी आय बँकेचे रिवॉर्ड पॉईंट रिडीम करा अथवा ते मुदतबाह्य होतील, असे सांगून एक अप्लिकेशन डाउनलोड करण्यास सांगितले.

तक्रारदार यांनी अप्लिकेशन डाऊनलोड केल्यानंतर त्यांच्या बँक खात्याची माहिती घेऊन रिमोट अॅक्सेसद्वारे बँक खात्यातून ९८ हजार ५०० रुपये काढून घेतले. काही काळ गेल्यानंतर आपली फसवणुक झाली असल्याची त्यांची खात्री पटली नंतर त्यांनी पोलिसात तक्रार दिली आहे.

get_footer();