आवृत्ती पुणे
← Back to Homepage

रुग्णाच्या केअरटेकर महिलेने चोरले सोन्याचे दागिने

Spread the love

पुणे : घरी आजारी असलेल्या आईची देखभाल करण्याकरिता आलेल्या मदतनीस महिलेने घरातील ४,४२,००० रुपयांचे दागिने चोरल्याची घटना आय बी एम रोड येथील घरात घडली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणी बी/१३, फ्लॅट नं.१०१ ब्रम्हा आय बी एम रोड, कोंढवा येथे राहणाऱ्या महिलेने फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांच्या घरी १० ऑगस्ट ते १२ ऑगस्ट दरम्यान त्यांच्या आजारी आईची काळजी घेण्यासाठी व्हिजन हेल्थ केअर या फर्मकडुन २४ तास काम करण्यासाठी दोन महिला मागविल्या होत्या.

त्यांनी फिर्यादी यांची नजर चुकवुन त्यांच्या लोखंडी कपाटातील ४,४२,०००/- रु.किंमतीचे सोन्याचे दागिणे चोरुन नेले. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक लेखाजी शिंदे करीत आहेत.

get_footer();