आवृत्ती पुणे
← Back to Homepage

लाखो रुपयांचे मॅफेड्रॉन केले जप्त

maharashtra jain warta • Maharashtra News Networks, MNN - Daily News(Post Slider), MNN - Social News, Other, Police • January 22, 2024
Spread the love

पुणे स्टेशनमध्ये करत होते विक्री, अंमली पदार्थ विरोधी पथक २ गुन्हे शाखेने केली कारवाई

पुणे स्टेशन परिसरात अंमली पदार्थाची विक्री करण्यासाठी आलेल्या आरोपीकडून १,६९,६०० रुपये किमतीचा मॅफेड्रॉन (एम.डी.) पावडर हा अंमली पदार्थ केला जप्त करण्यात आला आहे. अंमली पदार्थ विरोधी पथक २ गुन्हे शाखेने ही कारवाई केली आहे.

शेबाज कुरेशी, (वय २४ वर्षे, रा वडाला आर.टी.ओ. ट्रान्झेस कॅम्प चाळ, गल्ली नं १६ मुंबई) असे आरोपीचे नाव आहे.
त्याच्या ताब्यातुन ८ ग्रॅम ४८ मि.ग्र. मॅफेड्रॉन (एम.डी.) रुपये १,६९,६०० किमतीचा चा अंमली पदार्थ जप्त करण्यात आला आहे.
पोलीस निरीक्षक अनिता हिवरकर अंमली पदार्थ विरोधी पथक २, गुन्हे शाखा हया व पथकातील पोलिस अधिकारी व पोलिस अंमलदार असे पुणे शहर पोलीस आयुक्तालयातील पोलीस ठाण्याच्या परिसरात पेट्रोलींग करीत होत्या. पुणे रेल्वे स्टेशन परिसरात सार्वजनिक ठिकाणी आरोपीला अंमली पदार्थ विक्री करताना आढळला. त्याच्या विरुध्द बंडगार्डन पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला.
ही कामगिरी पोलीस आयुक्त रितेश कुमार, अपर पोलीस आयुक्त, गुन्हे शाखा, (मा. पोलिस सह आयुक्त अतिरिक्त कार्यभार) रामनाथ पोकळे, पोलीस उप-आयुक्त, गुन्हे अमोल झेंडे सहायक पोलीस आयुक्त, गुन्हे २ सतीष गोवेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दिगंबर चव्हाण, पोलीस अंमलदार चेतन गायकवाड, संदिप जाधव, रविंन्द्र रोकडे, महेश साळुंके, साहिल शेख, दिनेश बास्टेवाड यांनी केली आहे.

get_footer();