आवृत्ती पुणे
← Back to Homepage

वडगाव धायरीत चातुर्मासनिमित्त जैन संताचे प्रवेश मोठ्या उत्साहात

Spread the love

महाराष्ट्र जैन वार्ता

पुणे : राष्ट्रसंत आचार्य भगवंत पूज्य श्री आनंदऋषीजी म.सा. यांच्या कृपाशीर्वादाने प. पू. श्री रिध्दीमाजी म. सा. यांची सुशिष्या ज्ञान आरोही प. पु. श्री संबोधीजी म. सा., प. पु. श्री संस्कृतीजी म.सा., प. पु. श्री संयतीजी म. सा. आदि ठाणा ३ यांचा मंगलमय चातुर्मास प्रवेश वडगाव धायरी येथील श्री संघ सुवासीनी मंगल कार्यालय येथे संपन्न झाला.

पवित्र चातुर्मासास २० जुलै पासून प्रारंभ होत आसुन अनेक ठिकानी गुरु भंगवंताचे आगमन होत आहे. यावेळी संघाच्या वतीने भव्य स्वागत मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते. मिरवणुकीत पुणे परिसरातील जैन तसेच अजैन बांधवांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला.

यावेळी महिला भगिनी यांनी पारंपरिक गरबा, फुगडींचे फेर धरत स्वागत केले. जैन श्रावक संघ वडगाव धायरी, आनंद दरबार दत्तनगर, श्री संघ वारजे माळवाडी आदींनी उत्साहात सहभाग नोंदवला.

प. पू. संबोधिजी म. सा. यांनी २४ वर्षापूर्वी जैन दीक्षा घेऊन धर्म प्रचार करत तीर्थंकराचे बदल पुणे विद्यापीठ येथे भगवान महावीर स्वामीजींचे प्रथम शिष्य इंद्रभूती गौतमस्वामी यांच्या वर पीएचडी संशोधन करत आहेत.

कार्यक्रमात विशेष सत्कार भारतीय प्रशासकीय सेवेत (IAS) पदी नियुक्ती झाल्याबद्दल आनंद भंडारी यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी आनंद भंडारी यांनी उपस्थित जैन बांधवांना संबोधित केले.

यावेळी उपस्थित प्रमुख पाहुणे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी प्रमुख अतिथी रमणलाल लुंकड, सुनील बाफना, पोपटलाल ओस्तवाल, सुमतिलाल लोढा, सतीष मुथा, आदेश खिवंसरा, श्रवण नवले, विजय कोठारी, बाळासाहेब पोकळे, भरत संचेती यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

उपस्थितांचे स्वागत संघाचे अध्यक्ष प्रकाश बोरा, चातुर्मास समिती अध्यक्ष महेश फिरोदिया, आनंद दरबारचे अध्यक्ष बाळासाहेब धोका, श्री संघ वारजे अध्यक्ष अनिल लुणावत, हिरालाल फिरोदिया, अभय संचेती, प्रतीक देसरडा, प्रीतम बोरा, अभय बोरा अनिल संगवी, अभय गुगळे, हितेश लुंकड यांनी केले.

कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी जैन श्रावक संघ, महावीर ग्रुप वडगाव धायरी, आनंद महिला मंडळ यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन शैलेश जैन व आरती जैन यांनी केले. आभार महेश फिरोदिया यांनी मानले. यावेळी गौतम प्रसादीचा मान नहार परिवारास मिळाला.

get_footer();