आवृत्ती पुणे
← Back to Homepage

वाईन शॉप फोडणारे रेकॉर्डवरील गुन्हेगार केले जेरबंद

maharashtra jain warta • Maharashtra News Networks, MNN - Daily News(Post Slider), MNN - Social News, Other, Police • January 23, 2024
Spread the love

मुंढवा पोलीसांची कामगिरी

पुणे : वाईन शॉप फोडुन घरफोडी करणारे रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगारांना जेरबंद करण्यात आले आहे. मुंढवा पोलीसांनी ही कारवाई केली आहे. ओंकार ऊर्फ पल्या परमवार, (वय-२४ वर्षे, रा. ९२ जुना बाजार, नवी तालीम समोर खडकी) अरबाज शेख, (वय-१९ वर्षे, रा. घर नं.७७/२१, खडकी बाजार, गोपी चाळ, खडकी) यांना ताब्यात घेण्यात आले आहे.

आरोपींकडुन ३३,६०० रुपये किमतीची विदेशी दारु जप्त करण्यात आली आहे. मुंढवा पोलीस ठाणे हद्दीत केशवनगर भागात विरांश वाईन्स हे दुकान चार अज्ञात आरोपी यांनी फोडले. दुकानातील रोकड व विदेशी दारुच्या बाटल्याचे बॉक्स असा एकुण ४,६०,५७० रुपये किमतीचा मुददेमाल चोरुन नेला. त्याबाबत मुंढवा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल झाला होता. दाखल गुन्हयाचा तपास वरीष्ठांच्या मार्गदर्शनाखाली मुंढवा तपास पथक अधिकारी व अंमलदार करीत होते. तपासात दोन पथक नेमण्यात आले होते. दोन्ही पथकामार्फत सीसीटीव्ही च्या माध्यमातुन आरोपींचा शोध घेण्याचे काम चालु होते.
या तपासात सलग १५ दिवस एकुण २५० च्या वर सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. तपास चालु असतानाच तपास पथकातील पोलीस अंमलदार सचिन पाटील व स्वप्नील रासकर यांना माहीती मिळाली की, गुन्हयातील संशयित आरोपी खडकी परीसरात येणार आहे. तपास पथकातील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी योग्य तो सापळा रचुन संशयित दोन आरोपींना ताब्यात घेतले. त्यांना मुंढवा पोलीस स्टेशन येथे आणुन त्यांना विश्वासात घेऊन चौकशी केली असता त्यांनी व त्यांच्या दोन साथिदारांनी मिळून वाईन शॉप हे दारुची विक्री करण्याchya उददेशाने फोडुन घरफोडी केल्याची कबुली दिली. दोन्हीही आरोपी हे रेकॉर्डवरील गुन्हेगार असुन त्यांच्यावर पुणे शहरात विविध पोलीस ठाण्यास चोरीचे घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत.

get_footer();