आवृत्ती पुणे
← Back to Homepage

वाघोलीतील ज्वेलर्स दुकान फोडणारे चोरटे जेरबंद

Spread the love

पुणे : वाघोली परिसरात असलेल्या गणेश ज्वेलर्स दुकानाचे शटर उचकटून चोरी करणाऱ्या सराईत आरोपींसह त्याच्या साथीदाराला गुन्हे शाखा युनिट ६ च्या पथकाने अटक केली.

आरोपीकडून चोरीच्या दोन दुचाकी, दुकान फोडीसाठी लागणारे साहित्य असा ६५ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. हंसराज उर्फ हंसू रनजितसिंग टाक (वय २०) आणि सनिसिंग जितेंद्रसिंग जुनी (वय २२, रा. दोघेही, हडपसर) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

यातील हंसराज टाक हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्यावर दरोडा, घरफोडी यांसारखे २५ गंभीर गुन्हे दाखल आहेत. १५ जुलै रोजी वाघोलीतील गणेश ज्वेलर्स येथे चोरीची घटना घडली होती. पोलिसांनी दोघांना अटक करून लोणीकंद, येरवडा, देहू रोड पोलीस ठाण्यातील एकूण ५ गुन्हे उघडकीस आणले.

गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त अमोल झेंडे, सहायक आयुक्त सतीश गोवेकर, युनिट ६ चे पोलीस निरीक्षक उल्हास कदम यांच्या मार्गदर्शनाखाली कानिफनाथ कारखेले, नितीन मुंढे, ऋषीकेश ताकवणे यांच्यासह पथकाने ही कारवाई केली. दिनांक २५ जुलै रोजी गुन्हे शाखा, युनिट ६ कडील पोलीस अमंलदार हे गुन्हे प्रतिबंधक गस्त करत होते.

त्यावेळी पोलीस नाईक नितीन मुंढे यांना बातमी मिळाली की वाघोली येथील घरफोडीच्या गुन्हयातील आरोपी हंसराज टाक व सनीसिंग जुनी हे लोणीकंद पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये वाघोली ते भावडी रोडवर भैरवनाथ मंदिराजवळ मोकळ्या मैदानात चोरीच्या वाहनांसह थांबलेले आहेत.

खात्रीशीर बातमी मिळाल्याने त्यांनी ही माहिती वरीष्ठांना कळवली व त्यांनी कारवाई करण्याचे आदेश दिले. त्या ठिकाणी दोन इसम थांबलेले दिसले ते पळून जावु लागल्याने त्यांना शिताफीने ताब्यात घेण्यात आले. दोन होंडा शाईन दुचाकींसह इतर साथिदारांसह इको गाडी मध्ये येवुन गणेश ज्वेलर्सचे शटर उचकटुन दुकान फोडल्याची कबुली दिली आहे.

आरोपींपैकी हंसराज उर्फ हंसु, रनजितसिंग टाक हा रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असुन त्याच्यावर यापुर्वी दरोडा, घरफोडी असे एकुण २५ गंभीर गुन्हे दाखल आहेत. आरोपींकडुन दोन दुचाकी घरफोडी व एटीएम फोडन्यासाठी लागणारे साहित्य व हत्यारे असा एकुण ६५,०००/- रू. किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे.

सदरची कामगिरी पोलीस उप आयुक्त गुन्हे शाखा अमोल झेंडे, सहा. पोलीस आयुक्त, सतीश गोवेकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा, युनिट ६ चे पोलीस निरीक्षक उल्हास कदम, पोलीस अमंलदार विठ्ठल खेडकर, रमेश मेमाणे, कानिफनाथ कारखेले, नितीन मुंढे, ऋषिकेश ताकवणे, ऋषिकेश व्यवहारे, सचिन पवार, शेखर काटे, नितीन धाडगे, समीर पिलाने, बाळासाहेब तनपुरे, किर्ती मांदळे, प्रतिक्षा पानसरे व सुहास तांबेकर यांनी केली आहे.

get_footer();