आवृत्ती पुणे
← Back to Homepage

वाहनचालकांकडून पैसे घेणे वाहतूक पोलिसांच्या येणार अंगलट

Spread the love

पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांचे आदेश : खंडणीचा गुन्हा दाखल होणार

पुणे :आता वाहतुक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांना अडवून त्यांच्याकडून पैसे घेणे वाहतूक पोलिसांना आता अंगलट येणार आहे.

कारण वाहनचालकाकडून लाच घेताना आढळून आल्यास त्या वाहतूक पोलीस अधिकाऱ्यावर किंवा पोलिसावर थेट खंडणीचा गुन्हा दाखल करण्याचा इशारा पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिला आहे. त्यामुळे वाहतूक पोलिसांचे धाबे दणाणले आहे.

पुणे शहरामध्ये गुन्हेगारी वाढली आहे. त्यांच्यावर वचक बसवण्यासाठी केवळ गुन्हागारांवरच नाही, तर पोलिसांवर देखील अंकुश बसवला जाण्याची अपेक्षा नागरीका कडून व्यक्त होत होती. वाहतूक पोलिसांकडून वाहन चालकांना अडवून त्यांच्याकडून चिरीमिरी घेतानाचे व्हिडीओ सोशल मिडीयात व्हायरल झाले आहेत.

जर वाहतूक पोलिसांनी नागरिकांकडून विनाकारण पैसे घेतले, तर आता पोलिसांवरच खंडणीचा गुन्हा दाखल होणार आहे. पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी यासाठी काही कर्मचाऱ्यांची नियुक्ती देखील केली आहे. पोलिसांवर वचक ठेवण्यासाठी आयुक्तांनी हे पाऊल उचलले आहे.

पुणे शहरात वाहतुक कोंडीची गंभीर समस्या बनलेली आहे. वाहतूक कोंडी होत असताना वाहतूक पोलिसांकडून गाड्या उचलणे किंवा वाहन चालकांना अडवून त्यांच्याकडून दंड वसूल करण्यात पोलीस कर्मचारी मग्न असल्याचे दिसून येतात.

अनेकदा पोलीस चौकात न थांबता आडबाजूला थांबलेले असतात पोलीस कर्मचारी टोळक्याने चौकात थांबून वाहन चालकांना अडवून त्यांना कायद्याची भीती दाखवून कारवाईला सुरुवात करतात.
घाबरलेल्या वाहन चालकाकडून मोठ्या रक्कमेची मागणी करुन त्यांच्याकडून चिरीमिरी घेऊन त्यांना सोडून देतात.

वाहतूक पोलिसांकडून वाहन चालकांना अडवून त्यांच्याकडून चिरीमिरी घेतानाचे व्हिडीओ सोशल मिडीयात व्हायरल झाले आहेत. या घटनेची गंभीर दखल घेऊन पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी कारवाईचा बडगा उगारला आहे.

वाहनचालकाकडून लाच घेताना आढळून आल्यास त्या वाहतूक पोलीस अधिकाऱ्यावर किंवा पोलिसावर थेट खंडणीचा गुन्हा दाखल करण्याचा इशारा पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिला आहे. त्यामुळे वाहतूक पोलिसांचे धाबे दणाणले आहे.यामुळे निष्पाप सुजाण नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

पोलिसांवर वचक ठेवण्यासाठी पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी काही कर्मचाऱ्यांची नेमणूक केली आहे. हे पोलीस कर्मचारी साध्या वेशात वाहन चालक म्हणून शहराच्या वेगवेगळ्या भागात फिरणार आहेत.

वाहतूक पोलीस नागरिकांवर कारवाई गैरप्रकार आढळून आल्यानंतर तात्काळ संबंधित पोलीस कर्मचाऱ्यावर खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी महाराष्ट्र न्यूज नेटवर्कशी बोलताना सांगितले.

get_footer();