आवृत्ती पुणे
← Back to Homepage

वाहनाच्या धडकेने दुचाकीस्वार ठार

Spread the love

३३ वर्षीय युवकाचा अपघाती मृत्यू : वारजे येथील घटना

पुणे : पुणे – मुंबई महामार्गावर वारजे येथे केएफसी, पिझ्झा हट दुकानासमोर अज्ञात वाहनाच्या धडकेने बिबवेवाडी येथील ३३ वर्षीय दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार ९ जून रोजी पहाटे केएफसी, पिझ्झा हट दुकानासमोर हा अपघात झाला. वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष करून अज्ञात वाहनाने भरधाव वेगात धडक दिली.

मोटार सायकलस्वार ओमकार भिकन गुप्ता (वय ३३ वर्षे रा. राजीव गांधीनगर बिबवेवाडी पुणे) हा या अपघातात मृत्युमुखी पडला आहे. वाहन चालक न थांबता पळून गेला आहे, त्याचा तपास सुरु आहे. अशी माहिती वारजे पोलीस स्टेशनच्या पोलीस उप निरीक्षक तेजस्वी पवार यांनी दिली.

get_footer();