आवृत्ती पुणे
← Back to Homepage

वाहन चोरी करणाऱ्या गुन्हेगारांचा पर्दाफाश

maharashtra jain warta • Maharashtra News Networks, MNN - Daily News(Post Slider), MNN - Social News, Other, People, Police • February 16, 2024
Spread the love

कोथरुड पोलीसांची कारवाई : एकुण १२ दुचाकी जप्त

पुणे : वाहन चोऱ्या करणाऱ्या गुन्हेगारांचा पर्दाफाश करण्यात कोथरूड पोलिसांना यश आले असून त्यांनी धडाकेबाज कारवाई करून १२ दुचाकी जप्त केलेल्या आहेत.

पोलीस आयुक्त पुणे शहर यांनी वेळोवेळी वाहनचोरीस प्रतिबंध करणेबाबत व वाहनचोरीचे गुन्हे तात्काळ उघडकीस आणणेबाबतच्या सूचना दिल्या होत्या.

वाहनचोरीस प्रतिबंध करण्यासाठी कोथरूड पोलीस वाणे हद्दीमध्ये वेगवेगळ्या प्रकारे पेट्रोलिंग नेमण्यात आली होती. त्यामध्ये ट्रॅप लावणे, सीसीटीव्ही फुटेज चेक करणे, गोपनीय बातमीदारामार्फत माहिती प्राप्त करणे वगैरे प्रकारे वाहनचोरीस प्रतिबंध करण्याची व गुन्हे उघडकीस आणण्याची कार्यवाही चालू होती.

या मोहीमेदरम्यान ज्या ठिकाणी वाहनचोरीचे गुन्हे घडलेले आहेत, त्या भागातील सीसीटीव्ही फुटेजची पडताळणी व गोपनीय माहितगारामार्फत मिळालेल्या माहितीवरुन इसम नामे निलेश रमेश कंधारे (वय ३३ वर्षे) रा. फ्लॅट नं ३४, जय मल्हार हौसिंग सोसायटी एम. आय. टी. रोड, कोथरुड, पुणे याला तपासपथकामार्फत सापळा लावून, त्यास ताब्यात घेऊन त्याचेकडे केलेल्या तपासामध्ये त्याच्या कडून एकुण १२ गुन्हे उघडकीस आलेले आहेत.

आरोपीकडून अंदाजे ६ लाख रु.किमतीच्या मोटर सायकली जप्त करण्यात आलेल्या आहेत. अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग, पुणे शहर प्रविण पाटील, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ३. संभाजी कदम, सहा. पोलीस आयुक्त, कोथरुड विभाग निमराव टेके यांचे मार्गदर्शनाप्रमाणे कोथरूड पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप देशमाने, सपोनिरी बालाजी सानप, पोलिस अंगलदार अजिनाथ चौधर, विशाल चौगुले, संजय दहिभाते, आकाश माल्मिकी, विष्णु राठोड, अजय सिके, शरद राऊत, मंगेश शेळके यांनी ही कारवाई केली.

get_footer();