आवृत्ती पुणे
← Back to Homepage

विधीसंघर्षित 2 बालकांकडुन ३ दुचाकी हस्तगत

maharashtra jain warta • Maharashtra News Networks, MNN - Daily News(Post Slider), MNN - Social News, Other, Police, Social • January 16, 2024
Spread the love

सहकारनगर पोलीसांची कारवाई

पुणे : दुचाकी चालवण्याच्या हौसेसाठी वाहन चोरी करणऱ्या २ विधीसंघर्षित बालकाकडुन १,१०,०० किंमतीच्या ३ दुचाकी हस्तगत करण्यात सहकारनगर पोलिसांना यश आले आहे.

सहकारनगर पोलीस स्टेशन कडील तपास पथकातील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार असे वाहन चोरी, गुन्हे प्रतिबंधक पेट्रोलिंग व गुन्हेगार चेकिंग करीत असताना सहकारनगर पोलीस स्टेशनचे हददीतील शंकर महाराज मठ भागात दर्शनासाठी येणाऱ्या भावीकांच्या दुचाकी लावण्यासाठी पार्कीगची सोय करण्यात आली होती. त्या पार्कीगमधुन दुचाकी चोरी होवु नये यासाठी या भागात तपास पथकातील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी सापळा रचला. तेंव्हा दोन मुले त्यांच्याकडील हिरो होंडा स्प्लेंडर गाडी नं.MH-13-AS-9144 ही घेऊन या ठिकाणी आले व त्यांनी त्यांची गाडी महेंद्रा शोरुमच्या इमारती समोर पार्क करुन ते बर्गर किंग समोरील पार्किंग जागेत आले व तेथे पार्क केलेल्या दुस-या दुचाकी वाहनांना त्यांच्याकडील चावी लावुन हॅण्डल लॉक काढण्याचा प्रयत्न करु लागले. त्यांचा पोलीस स्टाफला संशय आल्याने सर्वांनी एकमेकांना इशारा करुन दोन्ही मुलांना त्यांच्याकडील गाडीसह ताब्यात घेतले. त्यांना गाडीबाबत व तिच्या कागदपत्रांबाबत विचारता ते उडवा उडवीची उत्तरे देऊ लागले. त्यांना त्यांच्या ताब्यातील गाडीसह सहकारनगर पोलीस स्टेशन येथे घेऊन येण्यात आले. व त्यांच्या पालकांना संपर्क करुन पोलीस स्टेशन येथे बोलावुन घेतले.
त्यांना विश्वासात घेऊन चौकशी केली असता त्यांनी त्यांच्याकडील गाडी चोरीची असल्याची कबुली दिली. मागील तीन चार दिवसापुर्वी आम्ही दोघांनी बर्गर किंग या दुकाना समोरून आणखी दोन दुचाकी आमचे कडील चावीने चोरी करुन इकडे तिकडे फिरवुन मौजमजा करुन त्या के.के. मार्केटचे पलीकडे असलेल्या लोअर इंदीरानगर बिबवेवाडी भागातील नाल्याजवळ पार्क करून ठेवल्या आहेत असे सांगितले. त्यांच्याकडुन एकुण १,१०,००० रूपये किंमतीच्या एकुण ०३ दुचाकी गाडया हस्तगत करण्यात आल्या आहेत. त्यांचे एकूण तीन गुन्हे उघड करण्यात आले आहेत.
ही कामगीरी अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशीक विभाग प्रविणकुमार पाटील, पोलीस उपायुक्त परिमंडळ-२, स्मार्तना पाटील, सहायक पोलीस आयुक्त, स्वारगेट विभाग नारायण शिरगावकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेंद्र माळाळे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) संदीप देशमाने सहकारनगर पोलीस स्टेशन यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक राहुल खंडाळे, बापु खुटवड, पोलीस अंमलदार अमोल पवार, निलेश शिवतारे, बजरंग पवार, सुशांत फरांदे, भुजंग इंगळे, महेश मंडलिक, नवनाथ शिंदे, विशाल वाघ, सागर कुंभार, यांनी केली आहे.

get_footer();