आवृत्ती पुणे
← Back to Homepage

विमल कांतीलालजी मुनोत प्री प्रायमरी स्कूलचे नामकरण संपन्न

maharashtra jain warta • Maharashtra Jain Warta • January 23, 2024
Spread the love

पुणे : सिद्धचलम वाघोली येथील प्री प्रायमरी स्कूलचे संथाराधारी विमल कांतीलाल मुनोत प्री प्रायमरी स्कूलचे नामकरण संपन्न झाले.
कांतीलाल मुनोत परिवारातर्फे कांतीलाल यांची पत्नी व उद्योजक राजेंद्र मुनोत यांच्या मातोश्री विमलबाई मुनोत त्यांच्या स्मृतीनिमित्त परिवाराने सिद्धचलम येथे प्री प्रायमरी स्कूल सुरू करून विमलाबाईंच्या स्मृती जपल्या.

हा कार्यक्रम शासन प्रभाविका प.पु. सुशीलकंवर म.सा. यांच्या १३ व्या स्मरणदिवशी वाघोली येथील सिद्धाएलम ट्रस्टच्या प्रांगणात झाला. अध्यक्षस्थानी भामाशाह प्रकाश धाडीवाल होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून शिरूरचे आमदार अशोकबापू पवार होते.
अध्यक्षीय भाषणात प्रकाश धाडीवाल यांनी मुनोत परिवाराला धन्यवाद दिले.
ते म्हणाले, मुनोत परिवार गेल्या ५० वर्षापासून निगडी प्राधिकरण येथे वास्तव्यास असून सामाजिक, धार्मिक कार्यात नेहमीच अग्रेसर असतात. साधू संतांची सेवा, धर्मकार्यात सहभाग घेत गरजुव्यक्तींना मदत अशा विविध माध्यमातून कांतीलाल मुनोत व परिवार सेवा देत असतात. काकाजी कांतीलालजी यांच्या पावलांवर पाऊल ठेवून राजेंद्र ही त्यांचा वसा उत्तमप्रकारे चालवत आहेत ही आनंदाची बाब आहे.
आमदार अशोकबापू पवार यांनीही या योगदानाबद्दल परिवाराचे आभार मानत आनंद व्यक्त केला.
त्यांनी सांगितले की, सिद्धाचलम संस्था ही गरीब परिवारांसाठी आशेचा किरण आहे. या परिवारांचा मुला-मुलींना संस्कार देणे, शिक्षण देण्याचे काम अतिशय कमी किमतीत प्रसंगी निशुल्कही सेवा देण्याचे काम ही संस्था करते. अशा संस्थेला हातभार लावायचे काम समाजाने करायला हवे. मुनोत परिवाराने हे केले त्याबद्दल त्यांचे अभिनंदन. संस्थेला कधीही काहीही मदत लागली, कोणतीही अडचण आल्यास मी संस्थेसाठी 24 तास उपलब्ध आहे. निसंकोच संपर्क करावा.
ताई म. सा.यांनी भाऊसा कांतीलालजी तथा विमलाबाईं प.पू.बेन म. सा.यांच्याबद्दल असलेल्या घनिष्ठ संबधांचा उल्लेख केला. या योगदानाबद्दल आनंद व्यक्त केला.
यावेळी सकल संघाचे अध्यक्ष विजयकांत कोठारी, विलास राठोड, पोपटलाल ओसवाल, बाळासाहेब धोका, जूगराज पालरेशा, मोहनलाल संचेती, प्रमोद मुथा, महावीर नहार, सतिष सुराणा, भामाशाह रमणलाल लुंकड, अशोक पगरिया, व्ही.टी. पालरेशा, चंद्रकांत पगारीया, चंदननगर संघाचे अध्यक्ष मनोज भंडारी, आनंदराम मुनोत, आकुर्डी निगडी प्राधिकरणाचे अनेक मान्यवर उपस्थित होते.

get_footer();