आवृत्ती पुणे
← Back to Homepage

वीज तारेचा धक्का लागून मुलाचा मृत्यू

Spread the love

पुणे : फ्लेक्स लावताना वीज तारेचा धक्का लागून मुलाचा मृत्यू झाल्याची घटना मांजरी परिसरात घडली आहे.

या प्रकरणी हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसानी दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणी कापड दुकानदारासह तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना १८ फेब्रुवारी रोजी घडली आहे. फिर्यादी यांचा अल्पवयीन मुलगा यास तो लहान आहे हे माहिती असुन सुध्दा त्यास दुकानात कामास ठेवुन फ्लेक्स लावण्यास सांगितले.

दुकानावरुन हाय वोल्टेज विजेची तार गेलेली असल्याचे माहीती असताना, हलगर्जीपणा केल्यामुळे मुलास तारेचा शॉक लागुन आग लागल्याने त्याचे डोके, मान, छाती व उजव्या हातास गंभीर दुखापत झाली. जखमी होवुन तो डॉक्टरांच्या तपासणीपुर्वीच मयत झाला. सहायक पोलीस निरीक्षक उमेश रोकडे पुढील तपास करीत आहेत.

get_footer();