आवृत्ती पुणे
← Back to Homepage

वीतराग सेवा संघाचा शपथग्रहण व सन्मान सोहळा उत्साहात संपन्न

Spread the love

पुणे : वीतराग सेवा संघ, साधना सदन पुणे यांच्या वतीने आयोजित शपथग्रहण समारंभ व जैन समाजातील “बहुआयामी महानुभावांचा सन्मान समारंभ” १ जून २०२५ रोजी मोठ्या उत्साहात व जैन बांधवांच्या उपस्थितीत महावीर प्रतिष्ठान, पुणे येथे संपन्न झाला.

ही संस्था गेली ४५ वर्षांहून अधिक काळ निस्वार्थपणे जैन समाजासाठी धार्मिक, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत आहे. आचार्य आनंदऋषीजी म. सा. यांच्या आशीर्वादाने व प. पू. प्रवीणऋषीजी म. सा. यांच्या प्रेरणेने १९८१ साली ही संस्था स्थापन झाली.

संस्थेचे ज्येष्ठ संस्थापक सदस्य कांतीलाल नहार यांच्या हस्ते नवनिर्वाचित कार्यकारिणीचा शपथविधी पार पडला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून प्रकाश धारिवाल व ललित गांधी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक संजय ओस्तवाल यांनी करत संस्थेच्या कार्याचा आढावा सादर केला.

नवीन अध्यक्ष दिलीप कांकरिया यांनी आपल्या मनोगतात सांगितले, “संस्थेचे कार्य सामाजिक हितासाठी सुरुच राहणार आहे. जेष्ठांचा सल्ला घेऊन नाविन्यपूर्ण समाजोपयोगी उपक्रम राबवले जातील.”

विजयकांत कोठारी, लखिचंद खिंवसरा, गौतमचंद सेठिया, अचल जैन, मोहनलाल संचेती, विनोद पोरवाल, फुलचंद बाठिया, खुबीलाल सोळंकी, विजय धोका, सुरेश नौलखा, प्राणदास (पुणे ॲडव्हंटेस्ट) यांचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला.

“४५ साल का अनोखा सफर” या स्मरणिकेचे प्रकाशन प्रकाश धारिवाल यांच्या हस्ते करण्यात आले. प्रकाश धारिवाल यांनी नव्या कार्यकारिणीला शुभेच्छा देत म्हटले, “संस्था गेल्या अनेक वर्षांपासून आरोग्य, शिक्षण, सामाजिक मदत अशा विविध क्षेत्रांत कार्यरत आहे. ही सेवा अखंड सुरु ठेवावी, त्यासाठी माझा पाठिंबा कायम आहे.”

कार्यक्रमास पृथ्वीराज धोका, विलास राठोड, बाळासाहेब धोका, राजेंद्र सुराणा, गौतम गेलडा यांच्यासह जैन समाजातील अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन रूपल चोरडिया यांनी केले, तर प्रवीण गुंदेचा यांनी उपस्थितांचे आभार मानले.

get_footer();