आवृत्ती पुणे
← Back to Homepage

शंभर वर्ष जुनी तुतारी शरद पवार यांना भेट

Spread the love

शरद क्रीडा सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या रौप्य महोत्सव वर्षानिमित्त गौरव

पुणे : लोकसभेच्या निवडणुकीत शरद पवार यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली महाविकास आघाडीला घवघवीत यश मिळाल्याबद्दल २२ जून रोजी शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या वतीने, संस्थापक, अध्यक्ष लक्ष्मीकांत खाबिया यांच्या संकल्पनेतून साकारलेले १०० वर्ष जुन्या तुतारीचे भव्य सन्मानचिन्ह लोकनेते शरद पवार यांना भेट देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.

शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठानचे रौप्य महोत्सवी वर्ष असल्याने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. त्याबद्दल शरद पवार यांनी मार्गदर्शन केले तसेच समाजोपयोगी उपक्रमांना विशेष प्राधान्य द्यावेत अशा सुचना लक्ष्मीकांत खाबिया व उपस्थित असलेल्या प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांना केल्या.

महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातून आलेल्या पदाधिका-यांनी महाविकास आघाडीच्या उमेदवारासाठी केलेल्या कामांचा लेखा जोखा यावेळी मांडण्यात आला. संस्थापक अध्यक्ष लक्ष्मीकांत खाबिया यांनी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळविण्यासाठी प्रतिष्ठानने केलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली.

यावेळी उपाध्यक्ष नंदकुमार बंड, विश्वस्त राहूल देशपांडे, विवेक थिटे, संदीप राक्षे, तेरव चित्रपटाचे दिग्दर्शक व शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठान वर्धा जिल्हाध्यक्ष हरिष इथापे, पुणे जिल्हाध्यक्ष अश्विनी पाचारणे, जळगावचे जिल्हाध्यक्ष विनोद भोईटे, नागपूरचे जिल्हाध्यक्ष रोशन खोब्रागडे, चंद्रपूरचे जिल्हाध्यक्ष जगदीश जुनगरी, बुलढाणा जिल्हाध्यक्ष ह.भ.प हरिदास आखरे, कोल्हापूरचे जिल्हाध्यक्ष पांडुरंग गजगेश्वर, नाशिकचे जिल्हाध्यक्ष किरण सानप, संभाजी नगरचे जिल्हाध्यक्ष ज्ञानदेव शिंदे, पुणे कार्याध्यक्ष डॉ. दादासाहेब गारगोटे, सोलापूरचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र जगताप सी ए आनंद देवतरसे, अरविंद कांबळे, संकेत राक्षे आदि मान्यवर कार्यकर्ते उपस्थित होते.

get_footer();