आवृत्ती पुणे
← Back to Homepage

शस्त्र बाळगल्याप्रकरणी दोघांना अटक

Spread the love

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क

पुणे : पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेचे युनिट दोन आणि तळेगाव दाभाडे पोलिसांनी वेगवेगळ्या दोन कारवायामध्ये शस्त्र बाळगल्याप्रकरणी दोघांना अटक केली आहे. त्यांच्याकडून दोन पिस्तूल आणि दोन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहे.

गुन्हे शाखा युनिट दोनने दिनेश पुखराज रेनवा (वय २८, रा. मोरेवस्ती, चिखली) याला अटक केली. याप्रकरणी पोलिस अंमलदार नामदेव कापसे यांनी चिखली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोरे वस्तीयेथील साईबाबा मंदिराजवळ एकजण पिस्तूल घेऊन आला असल्याची माहिती गुन्हे शाखा युनिट दोनला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा लावून दिनेश याला ताब्यात घेतले.

त्याच्याकडून ५० हजार ५०० रुपये किमतीचे एक पिस्तूल आणि एक जिवंत काडतूस जप्त केले.तळेगाव दाभाडे पोलिसांनी वतननगर येथून सुदर्शन सुदाम काशीद (वय २३, रा. इंदोरी, मावळ) याला अटक केली.

get_footer();