आवृत्ती पुणे
← Back to Homepage

शांतीनगर येथे महिलेची सोनसाखळी हिसकावली

Spread the love

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क

पुणे : पुणे शहरातील पदपथावर चालत असतांना सोनसाखळी हिसकावण्याचे प्रकार नेमीच घडतात. गर्दीतील चोरटे पळून जातात. आता हे प्रकार पुण्यालगतच्या उपनगर परिसरात ही वाढू लागले आहेत.

या प्रकरणी शांतीनगर सोसायटी, कोंढवा येथील ३१ वर्षीय महिलेने पोलिसात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार फिर्यादी महिला ५ जुलै रोजी बाळासाहेब देवरस हॉस्पीटलसमोर शांतीनगर या ठिकाणावरून मैत्रिणीसह घरी पायी जात असताना दुचाकी वरून आलेल्या चार चोरट्यांनी त्यांच्या गळ्यात असलेली सोनसाखळी हिसकावली. रात्री १०:३० च्या सुमारास हा प्रकार घडला.

get_footer();