आवृत्ती पुणे
← Back to Homepage

शालेय गरजू विद्यार्थ्यांना 4० सायकल भेट

Spread the love

लायन्स इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट 3234 डी 2 चा पुढाकार

पुणे : लायन्स इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट ३२३४ डी २ च्या वतीने पुण्यातील म्हात्रे पुलाजवळील शुभारंभ हॉल याठिकाणी उत्सव या कार्यक्रमांतर्गत रिजन कॉन्फरन्स आयोजित करण्यात आली होती.

या कार्यक्रमांतर्गत विविध ठिकाणच्या गरजू विद्यार्थ्यांना लायन्स क्लब ऑफ पुणे शताब्दीतर्फे १५ सायकल, लायन्स क्लब ऑफ पुणे अग्रसेनतर्फे १० सायकल, लायन्स क्लब ऑफ पुणे मेट्रोतर्फे १० सायकल, लायन्स क्लब ऑफ पुणे गॅलेक्सीतर्फे ३ तर लायन्स क्लब ऑफ पुणे स्टेटस यांच्यातर्फे २ सायकल अशा एकूण ४० सायकल भेट देण्यात आल्या.

या सायकल नावळी प्राथमिक विद्यालय जेजुरी, चंद्रकांत दरोडे हायस्कूल वडारवाडी आणि कै.य.ग.शोंद्रे आणि ह.तू.थोरवे महानगपालिका शाळा कात्रज येथील गरजू विद्यार्थ्यांना देण्यात आल्या आहे. यावेळी लायन्स इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट ३२३४ डी२ चे प्रांतपाल एमजेएफ विजय भंडारी, प्रमुख पाहुणे पीआयडी एमजेएफ नरेंद्र भंडारी, प्रमुख वक्ते द्वारका जालान, डिस्ट्रिक्टचे सीईओ शाम खंडेलवाल, खजिनदार राजेंद्र गोयल, रिजन चेअरपर्सन राजेंद्र गुगळे, आदी मान्यवर उपस्थित होते.

get_footer();