आवृत्ती पुणे
← Back to Homepage

शालेय मुलींना ‘गुड टच बॅड टच’ संदर्भात मार्गदर्शन

maharashtra jain warta • Maharashtra News Networks, MNN - Daily News(Post Slider), MNN - Social News, Other, People, Social • February 26, 2024
Spread the love

इनरव्हील क्लब व भारत विकास परिषद तर्फे आयोजन

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : पवन श्रीश्रीमाळ

बार्शी : इनरव्हील क्लब बार्शी व भारत विकास परिषद बार्शीतर्फे उपळाई ठोंगे, बार्शी येथील इंद्रेश्वर साखर कारखान्याच्या निवासी शाळेतील विद्यार्थ्यांसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.

शालेय मुलींना ‘गुड टच बॅड टच’च्या संदर्भात मार्गदर्शन करण्यात आले. त्याचप्रमाणे मुलींना केसांची काळजी घेण्याविषयीच्या विशेष टिप्स देण्यात आल्या. कार्यक्रमामध्ये प्रथम मुलामुलींना ‘गुड टच बॅड टच’ बद्दल विनीता भानुशाली यांनी मार्गदर्शन केले.

ज्या विद्यार्थ्यांचे पालक सकाळी लवकर ऊस तोडणीच्या कामाला जातात व कामाला गेल्यावर मुलामुलींसोबत कुठल्याही प्रकारचे अनुचित प्रसंग घडू नयेत यासाठी दक्षतापर शिबीर घेण्यात आले.

केस भरपूर वाढले असतील तर त्यांची निगा कशी राखावी, व त्याची काळजी कशी घ्यावी याचे मार्गदर्शन करण्यात आले. त्यावेळी सुभाषनगर भागातील प्रिंयका ब्यूटी पार्लर व अक्षरा ब्यूटी पार्लर यांचा वतीने सेवाकार्य म्हणून ६५ मुलींचे केस कापले व भारत विकास परिषद यांचा वतीने काही सौंदर्यप्रसाधनांचे वाटप करण्यात आले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरीता इनरव्हिल क्लबच्या अध्यक्षा विनीत भानुशाली, सचिव अंकिता चांडक, भारत विकस परिषद अध्यक्ष संतोष जोशी तसेस ब्युटी पार्लरच्या सुप्रिया चव्हाण, पुनम कदम, रेखा माने, आयशा बागवान, पूजा कांगरा, संतोषी मुरुडकर, ऐश्वर्या कदम, धनश्री घोडके यांनी प्रयत्न केले. इंद्रेश्वर साखर कारखान्याच्या शाळेचे प्रमुख शिवकरण गोसावी सर, शिक्षका कोमल साबळे व भाग्यश्री वांगरे यांनी दोन्ही क्लबचे आभार मानले.

get_footer();