आवृत्ती पुणे
← Back to Homepage

शाळेच्या आवारातील विजेचे खांब काढण्याची मागणी

maharashtra jain warta • Maharashtra News Networks, MNN - Daily News(Post Slider), MNN - Social News, Other, People, Social • February 23, 2024
Spread the love

भूम : शहरातील गुरुदेव हायस्कूलच्या शाळेच्या मैदानात विद्युत प्रवाह सुरु असलेले विजेचे खांब उभे असल्याने विद्यार्थ्यांना या पासुन धोका होऊ शकतो यामुळे विद्युत वाहक असलेले खांब काढण्यात यावे अशी मागणी करण्यात येत आहे.

ही मागणी युवासेना भूम परांडा वाशी विधानसभा प्रमुख प्रल्हाद आडागळे यांनी कार्यकारी आभियंता रोहित जोगदंड धाराशिव यांच्याकडे केली आहे.

गुरुदेव दत्त हायस्कुल भूम मध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्यांच्या जिवाला धोका होऊ शकतो म्हणून शाळेतील पालकांनी खासदार ओमराजे निंबाळकर यांच्याकडेही खांब काढण्याची विनंती केली आहे.

खासदार ओमराजे निंबाळकर यांनी कार्यकारी अभियंता रोहित धाराशिव यांना तात्काळ कार्यवाही करण्याचे लेखी आदेश दिला आहे. शहरामध्ये आलमप्रभू मंदीराकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यालगत गुरुदेव हायस्कूल ची शाळा आहे.

या ठिकाणी विद्यार्थ्यांची संख्या एक हजार वर असून या ठिकाणी शाळेचे ग्राऊण्ड प्रशस्त आणि मोठे असल्याने शाळेच्या मैदानामध्ये विद्यार्थी, विद्यार्थिनी खेळ खेळतात.

शाळेचे ग्राऊण्ड मोठे असल्याने राजकीय, सामाजिक, क्रिडा इतर कार्यक्रम या ठिकाणी होत असतात, या मैदानामध्ये विद्युत वितरण कंपनी ची थ्री फेज आणि सिंगल फेज ची हाय पावर ची लाईन गेलेली आहे.

या संदर्भात अनेक वेळा हायस्कूल व पालकांनी संबंधीत विभागाकडे विद्युत प्रवाह होत असलेले उभे खांब ग्राऊण्ड मधून काढण्यात यावे अशी मागणी केली आहे.

get_footer();