आवृत्ती पुणे
← Back to Homepage

शेअरच्या नफ्याचे आमिष दाखवुन ११ लाखाची फसवणूक

Spread the love

पुणे : शेअरमध्ये गुंतवणूक केल्यास मोठा नफा मिळू शकतो असे आमिष दाखवून तरुणाची ११ लाख रुपयांची फसवणूक करण्याचा प्रकार घडला आहे.

या प्रकरणी विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पुणे शहरातील सदाशिव पेठेत राहणाऱ्या एका तरुणाला अनोळखीने मोबाईलवर संपर्क केला.

शेअर्स ट्रेडिगचे मध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केल्यास नफ्याचे आमिष दाखविले. त्याच प्रमाणे सुरुवातीस काही प्रमाणात नफा देऊन फिर्यादी यांचा विश्वास संपादन केला. नंतर रक्कम देण्याचे टाळून फिर्यादी यांची ११,७५,०००/- रू ची आर्थिक फसवणुक केली आहे. हा तपास पोलीस निरीक्षक (गुन्हे) अरूण घोडके करीत आहेत.

get_footer();