आवृत्ती पुणे
← Back to Homepage

शेअरमध्ये गुंतवणुकीच्या आमिषाने ४१ लाखाची फसवणूक

Spread the love

पुणे : शेअर ट्रेडिंगमध्ये पैसे गुंतवणुक करून त्यातून भरपूर नफा मिळवून देतो असे आमिष दाखवून कोंढवा खुर्द मधील तरुणाची तब्बल ४१ लाख रुपयांची फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे.

या प्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हा फसवणुकीचा प्रकार १० एप्रिल ते २८ जून या काळात सुरु होता. एका तरुणाने फिर्यादीशी मोबाईलवर संपर्क साधला. शेअर ट्रेडिंगमध्ये पैसे गुंतवणुक करण्याचे सांगुन त्यातून भरपूर नफा मिळवून देतो असे अमिष दाखवून त्याच्या खात्यामधे ४१,२१,०१०/रू. वेळोवेळी भरण्यास भाग पडले.

फिर्यादीने नफा मिळण्याची वाट पाहिली, मात्र कोणतीही रक्कम परत न मिळाल्याने आपली फसवणुक केली असल्याचे त्यांच्या लक्ष्यात आले व त्यांनी पोलिसात तक्रार दाखल केली. पोलीस निरीक्षक (गुन्हे) मानसिंग पाटील तपास करीत आहेत.

get_footer();