आवृत्ती पुणे
← Back to Homepage

शेअर्स ट्रेडिंग मध्ये नफ्याचे प्रलोभन दाखवुन फसवणुक

Spread the love

पुणे : शेअर्स ट्रेडिंग मध्ये नफ्याचे प्रलोभन दाखवुन ४४,०४,०००/- रू. गुंतविण्यास भाग पडून फसवणुक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणी विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात टिंगरे नगर येथील एका ४२ वर्षाच्या इसमाने फिर्याद दिली आहे. २७ फेब्रुवारी पासून गेले मे महिन्यापर्यंत काही महिन्यात अनोळखी मोबाईल धारकाने त्यांना शेअर्स मध्ये गुंतवणूक केल्यास नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवले.

त्याला बळी पडून फिर्यादी यांनी वेळोवेळी रकमा गुंतवल्या. त्यातून त्यांची ४४,५०,००० रुपयाची फसवणुक झाली आहे. महिने झाले तरीही नफा काहीच ना मिळाल्याने त्यांनी अखेर पोलिसात तक्रार दिली आहे. पोलीस निरीक्षक पोलीस निरीक्षक (गुन्हे) साळुंखे तपास करीत आहेत.

get_footer();