आवृत्ती पुणे
← Back to Homepage

शेतकरी अमेय पाटील हाडोंग्रीकर यांचा आमरण उपोषणाचा इशारा

maharashtra jain warta • Maharashtra News Networks, MNN - Daily News(Post Slider), MNN - Social News, Other, People, Social • February 5, 2024
Spread the love

भूम : सेंद्रिय खताला अनुदान व शेतीमालास हमीभाव वाढवून द्यावा यासाठी शेतकरी अमेय पाटील हाडोंग्रीकर यांनी आमरण उपोषणाचा इशारा दिला

तसेच रासायनिक खताप्रमाणे सेंद्रिय खताला अन्नदान देण्यात यावे, शेतकऱ्याच्या शेतीमालास हमीभाव वाढवून मिळावा, विमा कंपनीने नुकसान झालेल्या हंगामातच त्वरित नुकसान भरपाई देण्यात यावी या मागण्यांसाठी देखील शेतकरी अमेय पाटील हाडोंग्रीकर यांनी आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे.
यासाठीचे निवेदन हे केंद्रीय कृषीमंत्री अर्जुन मुंडा यांना उपविभागीय सुधारून अधिकारी भूम यांच्यामार्फत देण्यात आले आहे. हे निवेदन ५ फेब्रुवारी रोजी देण्यात आले.
या निवेदनात प्रतिदिन शासन रासायनिक खतांना हजारो कोटी रुपये अनुदान देऊन कमी दरात शेतकऱ्यांना पुरवठा करतात. त्याच प्रकारे सेंद्रिय खत यामध्ये शेणखत, गांडूळ खत, गोमूत्र फवारणी, बायोगॅस स्लरी यांना अनुदान करून थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर वर्ग करावेत. त्यामुळे मातीचा पोत पाणी प्रदूषण होणार नाही, व कॅन्सर सारखे महाभयंकर रोग टाळता येईल. मोठ्या पशुंना २०० रुपये तर लहान पशुंना १०० रुपये अनुदान देण्यात यावे. शेतकऱ्यांच्या शेतीमालाला हमीभाव वाढवून देण्यात यावा यामुळे युवक शेतीकडे आकर्षिला जाईल व आर्थिक स्थिती सुधारल्याने शेती करणे परवडेल. पिक विमा कंपनीने चालू हंगामातच नुकसान भरपाई पंचनामे करून नुकसान भरपाई त्वरित देण्यात यावी या मागण्यांचा समावेश आहे.

get_footer();