आवृत्ती पुणे
← Back to Homepage

शेतकरी सेलच्या शहराध्यक्षपदी बाळासाहेब भिसे

Spread the love

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या असंघटित कष्टकरी, कामगार, शेतकरी सेलच्या पुणे शहराध्यक्षपदी बाळासाहेब भिसे यांची निवड करण्यात आली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या हस्ते नियुक्तीचे पत्र नुकतेच देण्यात आले. शिवाजीनगर पक्ष कार्यालयात आयोजित छोटेखानी कार्यक्रमात ही नियुक्ती करण्यात आली.

हडपसरचे बाळासाहेब भिसे हे कष्टकऱ्यांचे नेते व शरद पवारांचे कट्टर समर्थक आहेत. मागील लोकसभा व विधानसभा निवडणुकीत त्यांनी उमेदवारांचे अतिशय प्रामाणिक काम केले होते.

हडपसर शेवाळवाडी मार्केटमधील कष्टकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी भिसे यांनी सतत संघर्ष केला होता. त्यांच्या कार्याची दखल घेऊन शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी संपूर्ण पुणे शहरात असंघटित कामगार, कष्टकरी, शेतकरी यांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांना संधी दिली आहे.

get_footer();