आवृत्ती पुणे
← Back to Homepage

शेतकऱ्यांच्या हक्काचे २१ टीएमसी पाणी आणणार : तानाजी सावंत

maharashtra jain warta • Maharashtra News Networks, MNN - Daily News(Post Slider), MNN - Social News, Other, People, Social • January 22, 2024
Spread the love

१५६ कोटी २५ लाख रुपयांच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन

भूम : मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या हक्काचे २१ टीएमसी पाणी लवकरच आणणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे आरोग्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री तानाजी सावंत यांनी केले.

शहरासह तालुक्यात पालकमंत्री प्रा.डॉ. तानाजी सावंत यांच्या हस्ते १५६ कोटी २५ लाख रुपयांच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी शहरातील विविध समाज बांधवांकडून पालकमंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांचा नागरी सत्कार करण्यात आला. यावेळी बोलतांना पालकमंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांनी लवकरच हक्काचे २१टी एम सी पाणी देणार असल्याचे सांगितले तसेच शहरातील ग्रामीण रुग्णालयात एका महिन्यात डायलिसीस करण्यासाठी मशिन उपलब्ध करून देणार तसेच शहरातील नागरिकांसाठी उच्चदाबाचा पाणी पुरवठा मिळण्यासाठी ४६ कोटी रुपयांची पाणी पुरवठा योजना लवकरच मंजूर करण्यात येणार असल्याचे सांगितले. भूम येथे डॉ. सावंत यांच्या हस्ते १५६ कोटींच्या विकासकामांचे भूमिपूजन झाले. ते म्हणाले, लोकप्रतिनिधींच्या जबाबदाऱ्या व अधिकार काय हे असतात हे लक्षात घेतले पाहिजे. माजी आमदाराच्या घरात यापूर्वी २५ वर्ष सत्ता, नातेवाईक यांच्यात होती. त्यावेळी विकास करता आला नाही. गिरवली गावाला आपणच पाणी पुरवले. गावात स्मशानभूमी केली नाही. यापुढे पालकमंत्री म्हणाले की, मी युवासेना जिल्हा प्रमुख बाळासाहेब मांगले, बाळासाहेब हाडोंग्रीकर, जाकीर सौदागर, निश्चित चेडे, दत्ता मोहिते, बालाजी गुंजाळ, विशाल ढगे, विशाल अंधारे, निलेश शेळवणे, गौतम लटके, संजय पवार, अण्णासाहेब जाधव, बाळासाहेब गायकवाड, अॅड. सत्यवान गपाट यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.विकास केला नसेल तर जोडे घ्यायला तयार आहे हे मी आव्हान देतो. यावेळी यावेळी व्यासपीठावर माजी जिल्हा परिषद अध्यक्ष धनंजय सावंत, माजी नगराध्यक्ष संजय गाढवे, माजी नगराध्यक्षा संयोगिता गाढवे, जिल्हाप्रमुख दत्ता साळुंके, अण्णासाहेब देशमुख, महिला जिल्हाध्यक्ष अर्चना दराडे, तालुका प्रमुख राहुल डोके, शहरात उपजिल्हा व स्वतंत्र महिला रुग्णालय दिल्याबद्दल संयोगिता गाढवे यांनी आभार मानले व सोनोग्राफी व डायलीसिस मशीनची मागणी केली. भूम नगर परिषद राज्यात प्रथम आणू असा संकल्पही त्यांनी केला. यावर उत्तर देताना भाऊ या नात्याने ओवाळणी म्हणून एक महिन्याच्या आत डायलीसिस मशीन तसेच मार्च अखेर सीटीस्कॅन मशीन देणार असे मंत्री सावंत यांनी जाहीर केले. तसेच आठ दिवसाच्या आत ४६ कोटी रुपये मंजूर करू असे मंत्री सावंत म्हणाले.

get_footer();