आवृत्ती पुणे
← Back to Homepage

“श्रमण संघ रत्न” पुरस्कार व “विद्यार्थी गुणगौरव” सोहळा पुण्यात होणार साजरा

Spread the love

पुणे : ऑल इंडिया श्वेतांबर स्थानकवासी जैन कॉन्फरन्स, नवी दिल्ली – पंचम झोन (मुंबई-पुणे) यांच्या वतीने “श्रमण संघ रत्न” पुरस्कार तसेच “विद्यार्थी गुणगौरव” सोहळ्याचे आयोजन पुण्यात करण्यात आले आहे.

हा कार्यक्रम बुधवार, दि. १८ जून २०२५ रोजी दुपारी ३ वाजता, महावीर प्रतिष्ठान, सॅलीसबरी पार्क येथे पार पडणार आहे. या विशेष कार्यक्रमात पुणे जैन समाजाचे जानता राजा, श्रेष्ठ सुश्रावक रत्न, उद्योगपती, शांत संयमी पुणे की आन बान शान म्हणून ओळखले जाणारे विजयकांत कोठारी यांना “श्रमण संघ रत्न” या प्रतिष्ठेच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.

तसेच, पुणे जिल्ह्यातील सन २०२४-२५ मध्ये माध्यमिक, उच्च माध्यमिक, उच्च शिक्षण किंवा इतर विशेष शैक्षणिक प्राविण्य मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा “विद्यार्थी गुणगौरव” सोहळ्यात गौरव करण्यात येणार आहे.

या कार्यक्रमाचे आयोजन नितीन बेदमुथा, प्रांतीय अध्यक्ष पंचम झोन मुंबई-पुणे यांच्या पुढाकाराने व मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे. हा कार्यक्रम स्नेह, समर्पण व संस्कार यांचे प्रतीक ठरणार असून, पुणे जैन समाजासाठी एक अभिमानाचा क्षण ठरणार आहे.

get_footer();