आवृत्ती पुणे
← Back to Homepage

श्री वर्धमान जैन सार्वजनिक वाचनालयात प्रजासत्ताक दिन साजरा

maharashtra jain warta • Maharashtra Jain Warta, MJW - Social News, MJW Daily News(Post Slider), News Slider, Other, Social • January 29, 2024
Spread the love

बार्शी : श्री वर्धमान जैन सार्वजनिक तालुका वाचनालय, बार्शी येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त प्रमुख पाहुणे कमल कांकरिया व दिपा कांकरिया यांच्या हस्ते झेंडा वंदन व राष्ट्रगीत सादर करण्यात आले.

कमल कांकरिया यांचा सत्कार वाचनालयाचे संचालक आशोक कांकरिया यांच्या हस्ते करण्यात आला. दिपा कांकरिया यांचा सत्कार रश्मी पुनमिया यांच्या हस्ते करण्यात आला. या वेळी वाचनालयाचे अध्यक्ष किशोर श्रीश्रीमाळ, संचालक धीरज कुंकूलोळ, रूपेश कांकरिया, अशोक कांकरिया, प्रमोद भंडारी, श्री जैनाश्रमचे ट्रस्टी सर्व पदाधिकारी व संचालक मंडळ व वाचनालयाचे वाचक वर्ग व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. सुत्रसंचालन वाचनालयाचे संचालक धीरज कुंकूलोळ यांनी केले. ग्रंथपाल सुरेश यादव यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वाचनालयाचे ग्रंथपाल सुरेश यादव, पल्लवी तौर, विराज पंतगे यांनी परिश्रम घेतले.

get_footer();