आवृत्ती पुणे
← Back to Homepage

संत तुकाराम-ज्ञानेश्वर पालखी सोहळ्यात वारकऱ्यांना जीवनोपयोगी वस्तूंचे वाटप

Spread the love

पुणे : संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यानिमित्त श्री जैन युवक संघटना आणि सारसबाग मॉर्निंग ग्रुपतर्फे आलेल्या हजारो वारकऱ्यांना जीवनोपयोगी वस्तूंचे सन्मानपूर्वक वाटप करण्यात आले.

सुमारे ४,००० वारकऱ्यांना साडी, छत्री, नेपकिन, ब्लाऊजपीस यांचे वाटप करण्यात आले. यावेळी भद्रेश बाफना, सतीश शाह, बच्चू परमार, संपत जैन, सुरेश सुराणा, दिनेश कोठारी, जया नागौरी, भेरू राठोड, किरण जैन, अनिल गेलडा, वसंत शांड, विनोद ओसवाल, अशोक जैन, अशोक मेहता, विजयराज रांका, कला जैन, गुणवती सुराणा, लाजवंती परमार, सुरेश सोलंकी, रणजीत जोधावत, विजय कावेड़िया इत्यादींनी अत्यंत मेहनतीने या उपक्रमात सहभाग घेतला.

get_footer();